Monsoon Health Tips in Marathi : उन्हाळ्याच्या सुरुवातीला घराभोवती डासांची संख्या वाढू लागते, त्यामुळे अनेक विषाणूजन्य आजार होतात. पावसाळाचे आगमन होताच डेंग्यूच्या डासांचा उद्रेक सुरू होतो. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया (dengue and malaria) आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढतो. जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गासोबतच डासांमुळे होणाऱ्या अनेक आजारांच्या तक्रारी वाढतात. डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. दरवर्षी अनेक लोक डेंग्यूचे बळी ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) माहितीनुसार अलिकडच्या दशकात डेंग्यूच्या जागतिक प्रकरणांमध्ये वाढ झाली असून जगातील निम्म्या लोकसंख्येला डेंग्यूचा धोका आहे. डेंग्यू हा एडिस नावाच्या डासाच्या चावण्याने होतो आणि हा डास स्वच्छ पाण्यात वाढतो. हा डास जास्तकरुन दिवसा चावतो. डेंग्यू कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो, परंतु त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये दिसून येतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स सतत कमी होतात. तसेच शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात. यावर वेळेत उपचार मिळाने नाहीत तर वेळेप्रसंगी रुग्ण दगावू देखील शकतो. या आजाराची कोणती लक्षणे आहेत? त्यावर कोणते उपचार घेतले पाहिजे, यावर सविस्तर जाणून घेऊया... 


डेंग्यूचा प्रसार कधी होतो? 


डेंग्यूचा प्रसार पावसाळा सुरू झाला की म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत होतो. यानंतर हिवाळा सुरू होतो. त्यामुळे या मोसमात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती योग्य होत नाही. मात्र काही वेळेस हे मच्छर आणि डेंग्यूचे रुग्ण अनेक महिन्यांपर्यंतही आढळून येत असतात. पावसाळ्यात डबकी साचतात, पाणी तुंबते, सर्वत्र ओलावा असतो. त्यामुळे या अळ्यांना जन्मास एकदम अनुकू वातावरण मिळते.  


लक्षणे काय आहेत?


पाऊसाळा सुरू झाला की डेंग्यूसारख्या आजार पसरण्याचा धोका वाढतो. डेंग्यूची लक्षणे म्हणजे खूप ताप, शरीर, डोके आणि सांधे दुखणे, मळमळ आणि उलट्या, डोळ्यांच्या मागे दुखणे, त्वचेवर लाल ठिपके किंवा पुरळ येणे, नाकातून किंवा हिरडयातून रक्त येणे, मल काळे पडणे यासारखी लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात जाऊन डेंग्यूची चाचणी करून घ्या. डेंग्यूचा प्रभाव 3 ते 9 दिवस शरीरात राहतो. यामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि शरीरातील प्लेटलेट्समध्ये सतत घट होत असते. या लक्षणाबाबत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.


डेंग्यूपासून असा बचाव करा


  • डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी घरातील स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी.

  • कुलर, भांडे, भांडी इत्यादीमध्ये पाणी देऊ नका.

  • झोपताना नेहमी मच्छरदाणीचा वापर करा.

  • संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला आणि खोल्या स्वच्छतेसह हवेशीर ठेवा

  • घराच्या आजूबाजूला अस्वच्छ वस्तू ठेवू नका.

  • साचलेले पाणी आणि घाण यावर कीटकनाशकांचा वापर करा.

  • रिकामी भांडी, टायर आणि जुनी भांडी, फुलदाणी आणि इतर गोष्टींमध्ये पाणी देऊ नका.

  • गोठलेल्या पाण्यात कीटकनाशक किंवा रॉकेल घाला.

  • डासांपासून दूर राहण्यासाठी घराच्या दारात-खिडक्यांना जाळ्या लावा.

  • डेंग्यूची लक्षणे दिसल्यावर ताबडतोब आपल्या आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्याची तपासणी करा.


 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)