Monsoon Skin Infection : पावसाळा म्हटलं की, अनेक आजारांना जणून निमंत्रणच मिळतं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी आणि त्यामध्ये असणाऱ्या जंतूचा त्वचेशी ( Skin Infection ) थेट संपर्क येतो. यामुळे त्वचेला त्रास होऊन अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 


का होतं स्किन इन्फेक्शन? ( Skin Infection )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाचं पाणी हवेतील प्रदूषकांमध्ये मिसळतं त्यामुळे त्वचेच्या समस्या ( Skin Infection ) उद्भवतात. यावेळी त्वचा लाल होणं आणि त्वचेला खाज सुटणं या समस्या दिसू लागतात. पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढते आणि कीटकांची पैदास होते ज्यामुळे त्वचेच्या समस्या ( Skin Infection ) निर्माण होतात. 


पावसाळ्यात त्वचेचं इन्फेक्शन कसं टाळाल?


मुंबईतील डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यावेळी त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये घट्ट कपडे आणि रबरच्या वस्तूचा वापर करणं टाळा. नेहमी सुती कपड्यांचा वापर करावा. जास्त वेळ ओले न राहणे आणि पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी.  


डॉ. कपूर यांनी पुढे सांगितलंय की, घाणेरडे पाणी किंवा ऍलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांपासून दूर रहावं. जसं की प्राण्यांचे केस, धूळ, घाण आणि परागकण. त्वचेची चांगली काळजी घेणे जसे की त्वचेला खाजवणे तसेच संसर्ग टाळणे. त्वचेसाठी औषधी साबण, अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पावडर वापरा. बाहेर पडण्यापूर्वी दररोज सनस्क्रीन वापरा. घरातील चादरी, टॉवेल, गाद्या स्वच्छ आणि कोरड्या ठेवा.


पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढतं. यावेली कीटकांची पैदास होते ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. हवेतील परागकण आणि पाळीव प्राण्यांच्या केसांमधील कोंडा हे देखील त्वचेच्या समस्येस कारणीभूत ठरतं. अशा वेळी तुमच्या घरी असलेल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. यामध्ये जर तुम्हाला त्वचेच्या संसर्ग झाला तर तातडीने करणं गरजेचं.