मुंबई : मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातला बहुतांश वेळ अनेक जण मोबाईल, टॅब किंवा टीव्ही-लॅपटॉपसमोर असतात. कोरोनामुळे तर ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानं जास्तीत जास्त वेळ आपण स्क्रीनसमोरच असतो. मात्र जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्याचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असल्याचं समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या स्क्रीनमधून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशाला हाय एनर्जी व्हिजिबल किंवा HEV म्हणतात. यालाच ब्लू लाईट असेही संबोधले जाते. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपेक्षाही हा ब्लू लाईट त्वचेमध्ये जास्त आत शिरतो. त्यामुळे सुरकुत्या पडणं, त्वचा कोरडी होणं अशा समस्या उद्भवतात. 


काही उपायांमुळे ब्लू लाईटचा परिणाम कमी करता येतो. 


१. अँटी HEV सौंदर्य उत्पादनांचा वापर करून त्वचेवरील दुष्परिणाम आटोक्यात ठेवता   येतो. 
२. सनस्क्रीन वापरणार असाल, तर त्यात अँटी HEV घटक आहेत की नाही ते    तपासून घ्या. 
३. क्रीम किंवा तेलातील अँटी ऑक्टिडण्टमुळे ब्लू लाईटपासून संरक्षण मिळते. 
४. टोमॅटोचा अर्क असलेलं फेशियल ऑईल यावर उपयुक्त आहे. 
५. चेहरा धुतल्यानंतर फेशियल ऑईलचे २-३ थेंब हातावर घेऊन चेहऱ्याला मसाज   करा. 
६. मेकअप करायचा असल्यास फाऊंडेशन क्रीममध्ये तेलाचे २-३ थेंब टाका. 


अर्थात, हे कृत्रिम उपाय झाला. स्क्रीनसमोर कमीत कमी काळ राहणं हाच सर्वोत्तम मार्ग... आपल्या स्क्रीन टाईमचे योग्य नियोजन केलं तर ते शक्य आहे.