मुंबई : आजकाल सर्वत्र इमारतींची उंची वाढतेय, अनेक वस्त्यांमध्येही दाटीवाटी होत चालली आहे. ९ तासांच्या ऑफिसच्या विळख्यात कर्मचाऱ्यांसाठी सकाळचं ऊन अगदीच कमी झालं आहे. अशातच अनेकांमध्ये व्हिटॅमिन डीची मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसतेय. ज्यामुळे चिडचिडेपणा आणि थकवा येणं या समस्या वाढताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच एका शोधाअंतर्गत, जगभरात ७० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. यात गर्भवती महिलांचं प्रमाण अधिक आहे.


व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लोकांच्या मांसपेशी कमकुवत होत असून अंगदुखीचा त्रास होताना दिसतो. तुमच्या शरीरातही व्हिटॅमिन डीची कमतरता आहे का? या लक्षणांवरुन जाणून घ्या...


केस गळणं 


केस गळण्याची समस्या जवळपास सर्वांमध्येच पाहायला मिळते. व्हिटॅमिन डीची कमतरता हे केस गळण्याचं कारण होऊ शकतं. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केसांची पकड कमकुमत होते. त्यामुळे केस अधिक प्रमाणात गळू शकतात.


थकवा


दिवसभर थकवा जाणवणं हे व्हिटॅमिन डी कमी असण्याचं लक्षण आहे. भरपूर आराम आणि झोपेनंतरही थकवा जाणवत असल्यास व्हिटॅमिन डीची टेस्ट करुन घ्यावी. याच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो. अनेकदा ब्लड प्रेशर कमीदेखील राहतं.


अंगदुखी


शरीरात सतत दुखणं हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं एक लक्षण असू शकतं. जर दिवसभर शरीरात, विशेषत: साध्यांमध्ये दुखत असल्यास हे व्हिटॅमिन डी कमी असण्याचं कारण ठरु शकतं.


जखमा लवकर न भरणे


छोटीशी जखमही लवकर भरत नसेल तर ते व्हिटॅमिन डीचं कारण असू शकतं. 


जर तुम्हालाही या समस्या जाणवत असतील तर व्हिटॅमिन डीची टेस्ट करणं गरजेचं आहे. 


ही समस्या दूर करण्यासाठी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान उन्हात फिरा. डाएटमध्ये, अंडी, पनीर, मशरुम आणि सोयाबीन यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.