जर तुम्ही सुद्धा सकाळी उशीरा उठत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्या कामाची आहे. आपण सर्वांनी एक म्हण ऐकली असेल की, जर सकाळ चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. मुख्य म्हणजे हीच गोष्ट तुमच्या आरोग्यासाठीही लागू होते. जर आपण सकाळी योग्य सवयी घेतल्या तर आपण दिवसभर तंदुरुस्त राहू शकू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह म्हणतात की, जर तुम्ही सकाळी उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडलात किंवा झोपेतून उठताच मोबाईल पाहण्यास सुरूवात केली तर कदाचित या सवयींचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. आणि नकळत तुम्ही आजारी पडू शकता. 


या सवयी लवकर बदला


उशीरा नाश्ता करणं


डॉ रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सकाळचा नाश्ता खाण्यात कधीही उशीर करू नये. जर तुम्ही सकाळता नाश्ता केला नाही तर तुमची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होऊ शकते आणि तुम्ही आजारांना बळी पडू शकता. सकाळच्या न्याहारीमध्ये फळांता समावेश करू शकता. याशिवाय ड्रायफुट्स, फळांचा ज्युस, रोटी, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करावं.


सकाळी उठल्यावर तासनतास बेडवर पडून राहणं


डॉ. रंजना सिंह म्हणतात की, सकाळी उठल्यानंतर लवकरात लवकर बेडवरून उठलं पाहिजे. परंतु असे बरेच लोक आहेत उठल्यावरही बेडवर झोपलेले असतात. जर तुम्ही असं केलं तर आपल्याला दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवेल. यासाठीच आपण सकाळी उठून 1 तासाचा व्यायाम किंवा योगा केला पाहिजेत. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 


चहा-कॉफीचं सेवन


बहुतांश लोकं सकाळी उठल्याबरोर चहा किंवा कॉफीचं प्रथम सेवन करतात. मात्र असं करणं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्र हे दोन्ही गोष्टींना योग्य मानत नाही. असं केल्याने पोटात गॅस आणि इतर समस्या उद्भवू शकतात. म्हणून, चहाच्या ऐवजी तुम्ही दूध किंवा हंगामी फळांचा ज्युसचं सेवन करू शकता.


व्यायाम न करणं


डॉ रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठून व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. व्यायाम केल्याने केवळ तुम्ही दिवसभर एक्टिव्ह राहत नाही तर तुमचे स्नायू, हाडं आणि शरीराचे बरेच भागंही मजबूतही होतात. याचप्रमाणे अनेक गंभीर आजारही दूर राहतात. याशिवाय तुमचं मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते.