Mosquito coil : सावधान! तुम्ही डासांसाठी घरात ही कॉइल लावता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक आहे…
दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
Mosquito coil : दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. पावसाळ्याच्या (monsoon) दिवसात तर डासांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोक डासांपासून दूर राहण्यासाठी क्रीम, विविध प्रकारच्या वनस्पती, मच्छरदाणी (Creams, different types of plants, mosquito nets), आणखी एक गोष्ट जी ती म्हणजे कॉइल (coil) वापरतात. अर्थात कॉइलच्या वापराने डासांपासून अल्पावधीतच सुटका होते, पण कॉइलचा वापर आरोग्यासाठी (health) किती हानिकारक (Harmful) आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
कॉइल शरीरासाठी घातक
एका संशोधनात असे आढळून आले की, एक कॉइल 100 सिगारेट्सइतकी धोकादायक आहे. त्यातून PM 2.5 धूर निघतो जो खूप जास्त आहे. जरी ते तंबाखूइतका धूर सोडत नाही, परंतु त्यात शरीरासाठी घातक अशी अनेक घटक असतात.
मॉस्किटो रिपेलेंट कॉइलमध्ये बेंझो पायरेन्स, बेंजो फ्लोरोइथेन सारखे घटक असतात. त्याच वेळी, या मॉस्किटो किलर कॉइलमुळे तुमच्या शरीराचे आणखी नुकसान होते.
कॉइलच्या सततच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. जास्त एक्सपोजरमुळे फुफ्फुसांवरही परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते, जर कोणी कॉइलच्या धुरात जास्त वेळ श्वास घेत असेल तर दमा होण्याचा धोका वाढतो. त्याच वेळी, ते मुलांसाठी अधिक हानिकारक आहे.
कॉइलमधून निघणाऱ्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होतोच, पण त्याचा परिणाम त्वचा आणि डोळ्यांवरही होतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ होणे इत्यादी समस्या निर्माण होतात.