Mosquitoes Protection Budget Hacks : थंडीत (Winter) डासांच्या (Mosquitoes) प्रमाणात वाढ होते. हे डास आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. अनेकदा या डासांमुळे आपल्या आरोग्य (Health) बिघडण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. जिथे स्वच्छता नाही तिथे डास आहेत. त्यामुळे आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. डासांची समस्या बहुधा संपूर्ण देशात आहे आणि डास जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात आणि त्यांच्यामुळे अनेक रोगांचा धोका आहे. डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria) यांसारखे अनेक आजार डासांमुळे होतात आणि अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जास्त डास असतील तर तुम्ही अनेक प्रकारचे रिपेलेंट्स वापरत असाल. (Mosquitoes Protection Do this solution for just 10 rupees to protect against mosquitoes nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात डासांपासून बचाव करणारे कॉइल (Mortein ), अगरबत्ती, साउंड मशीन, इलेक्ट्रिक बग कॅचर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत, मॉस्किटो रिपेलंट मशिनसोबत (Mosquito Repellent) येणाऱ्या द्रवामध्ये इतकी रसायने असतात की अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. तुम्हाला माहित आहे का? डासांपासून बचाव करणाऱ्या प्रोडक्ट्स (Products) मध्ये अनेक प्रकारची रसायने असतात ज्यांचा आपल्याला त्रास होऊ लागतो. तर काही मच्छर प्रतिबंधकांमुळे त्वचेची ऍलर्जी (Allergies), सायनस समस्या (breathing problems), श्वास घेण्यास त्रास किंवा डोकेदुखी (headaches) होऊ शकते.



आज आम्‍ही तुम्‍हाला घरीच्या घरी डासांपासून बचाव करण्‍याचे दोन मार्ग सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला त्याचा योग्य फायदा होईल. 


1. पहिला मार्ग



पहिल्या पद्धतीत फक्त दोनच गोष्टी वापरता येतील. तुम्ही 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही हे साहित्य तयार करु शकता. आणि हे साहित्य तुमच्या घरातच मिळेल. 


साहित्य-


1. अर्धा लिटर टर्पेन्टाइन तेल (Oil of turpentine)
2. 20-50 ग्रॅम कापूर (Camphor)


तुम्हाला फक्त कापूर चांगले बारीक करून त्याची पावडर बनवायची आहे. यासोबत टर्पेन्टाइन ऑइलमध्ये मिसळा आणि मॉस्किटो रिपेलंट रिफिलमध्ये भरा. सामान्य बाजारातून आणलेल्या रिफिलप्रमाणेच ते मशीनमध्ये वापरले जाऊ शकते. घरामध्ये असलेल्या सर्व मशीनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. यासोबतच खोलीला टर्पेन्टाइन आणि कापूरचा वास येईल. ते स्प्रे बाटलीत भरूनही वापरता येते.


 




2. दुसरा मार्ग


साहित्य-


कडुलिंब तेल (2 चमचे) (Neem oil)
खोबरेल तेल (अर्ध वटी) (Coconut Oil)
उकळलेले पाणी
वोडका (4-5 चमचे) (vodka)


हे सर्व घटक एकत्रितपणे डासांपासून बचाव करणारा स्प्रे बनवू शकतात. वापरण्याची पद्धत पूर्वेसारखीच आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही ऑइल डिफ्युझरमध्ये वापरू शकता आणि स्प्रे बाटलीत ठेवून घरामध्ये शिंपडू शकता. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)