मुंबई : आजारी पडणं कोणालाही आवडत नाही. मात्र प्रत्येक व्यक्ती कधीना कधीतरी हा आजारी पडतोच. आजारपण आलं की आरोग्याची स्थिती खालावते. त्याचसोबत औषध आणि उपचारांवर होणारा खर्चही कमी नसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत कॅन्सर-हृदयासारख्या आजारांचे उपचार सर्वात महागडे असतात असं आपल्याला माहिती आहे. या उपचारात लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे जगातील सर्वात महागडे औषध कोणतं आहे. जगातील या महागड्या औषधाची किंमत लाखो नाही तर कोट्यवधी रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग औषधांबद्दल सांगणार आहोत.


सीएनबीसीच्या अहवालानुसार, स्पाइनल मस्क्युलर एट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) हा जगातील एक दुर्मिळ आजार आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये SMA असंही म्हणतात. हा आजार मानवी शरीरात एसएमएन -1 जीनच्या कमतरतेमुळे होतो. SMAमुळे, रुग्णांच्या छातीचे स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि श्वास घेण्यास अडचण येते.


मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी यूकेमध्ये 80 बाळांना जन्मासोबत हा SMAची समस्या असते. इतर देशांमध्येही दरवर्षी या आजाराची अनेक प्रकरणे नोंदवली जातात. या आजारामध्ये मुलाच्या पाठीच्या कण्यामध्ये पक्षाघात होऊ शकतो.


या आजाराच्या उपचारात जोलजेन्स्मा (Zolgensma) नावाचं औषध वापरलं जातं. हे औषध जगातील नामांकित फार्मास्युटिकल कंपनी नोव्हार्टिस यांनी विकसित केलं आहे. हे औषध बाजारात येण्यापूर्वी अमेरिका आणि युरोपच्या देशांनी त्यांचा काटेकोरपणे तपास केलाय. दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तयार केलेली ही जगातील पहिली जीन थेरपीचं औषध आहे.


जोलजेन्स्मा (Zolgensma) या औषधाच्या एका डोसची किंमत ही तब्बल 18 करोडोंच्या घरात आहे. दरम्यान काही ठिकाणी या औषधाची किंमत 16 करोड रूपयांच्या घरात आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने सांगितल्याप्रमाणे, नोव्हार्टिस जीन थेरपीद्वारे निर्मित जोलजेन्स्मा हे जगातील सर्वात महाग औषध असू शकतं. SMAवरील उपचारांसाठी हे औषध फायदेशीर आहे. हे जीनची कमतरता भरून काढतं.