मुंबई : बरेच लोक तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात, ज्यामुळे त्यांना खाताना, बोलताना अगदी पाणी पिताना देखील त्रास होतो. तोंडात अनेक कारणांमुळे फोड येऊ शकतात, जे कधी पांढरे तर कधी लाल दिसतात. याला माउथ अल्सर देखील म्हणतात आणि हे फारच वेदनादायक असतात. ज्यामुळे आपल्याला अन्न खाणं देखील कठीण होऊन जातं. परंतु तुम्हाला हे माहितीय की, तोंडाला फोड का येतं? मुख्यतः पोटात गडबड झाल्यामुळे तोंडाला फोड येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी खाव्या लागतील, ज्यामुळे तुमच्या पोटाचा प्रॉब्लम सॉल्व होईल. मग तोंड आल्यास काय काय खावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे लगेचच तुम्हाला फरक जाणवेल.


दही


दिवसातून कमीत कमी एक कप दही खाल्ल्याने तोंडाच्या फोडांपासूनही सुटका मिळेल आणि वारंवार अल्सर होण्याची समस्याही होणार नाही. यामुळे तुमच्या पोटालाही थंडावा मिळतो.


टरबूज


रसदार फळे खाल्ल्याने तोंडाच्या फोडांपासून आराम मिळतो. टरबूज व्यतिरिक्त, तुम्ही द्राक्षे देखील खाऊ शकता.


मध


मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तुम्ही ते खाऊन अल्सरवरही लावू शकता. त्यामुळे फोड पसरत नाहीत.


तुळस


तुळशीची पाने चावून पाणी प्यायल्याने तोंडाच्या फोडांपासून आराम मिळतो. त्यामुळे अल्सर संपू लागतात.


टोमॅटो


कच्चा टोमॅटो खाल्ल्यास तोंडाचे व्रण जातात. अल्सरपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक टोमॅटोचा रस त्या फोडांवरती लावतात.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)