मुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
Heat wave and diabetes: डिहायड्रेशन आणि डायबेटिस अनेकदा एकत्र दिसतात. जेव्हा जेव्हा सूर्य तापतो आणि उष्णता जास्त असते. अशा स्थितीत मधुमेह असलेल्या लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि रक्तात जास्त प्रमाणात साखर तयार होऊन त्याला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंडे जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. यामध्ये प्रामुख्याने वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
द्रवपदार्थ घ्या
प्रवासात किंवा बाहेर जास्त फिरणे म्हणजे डिहायड्रेशनला निमंत्रण देणे. हे टाळण्यासाठी तुम्हाला तहान लागलेली नसेल तरीही भरपूर पाणी, फळांचा रस आणि कॅफिनमुक्त पेयांचे सेवन करा. तुम्ही शहाळ्यांचे पाणी, शुगर-फ्री लेमनटी, लस्सी आणि अशी कितीतरी पेये घेऊ शकता. अशा वातावरणात अल्कोहोल आणि कॅफिनचे अल्कोहोल मात्र कटाक्षाने टाळा.
उन्हापासून दूर रहा
उन्हाळ्यात लोकांना कधी कधी सहलीला जाण्याचा प्लॅन करतात. किंवा भर उन्हात फिरायला जातात. मात्र मधुमेह असलेला व्यक्ती खूप वेळ उन्हात राहिल्यास त्यांना थकवा येण्याचा धोका अधिक आहे. या दिवसात गरगरल्यासारखे वाटणे, घाम येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हृदयाची धडधड वाढणे आणि मळमळणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवा.
व्यायाम करा
आराम हा उन्हाळा सुखात घालवायच मंत्र आहे हे खरे, पण मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही जर पहाटे लवकर किंवा संध्याकाळी उशीरा घराबाहेरचे वर्कआऊट करु शकता. पण जेव्हा उन्हाळ्याचा पारा वाढेल असे वाटतं असेल तेव्हा घरातल्या घरात व्यायाम करणे किंवा योगासने करणे योग्य राहील.
योग्य आहार घ्या
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संतुलित आणि सकस आहारपद्धतीचे पालन करावे. शरीरातील ग्लुकोजची स्थिती बिघडवतील असे पदार्थ खाण्याचे मोह टाळला पाहिजे.
आनंद घ्या
उन्हाळाची सुट्टी म्हणजे विश्रांती आणि दिलखुलास वागण्याचे दुसरे नाव. परंतु मधुमेहामुळे असे करणे कठीण जाऊ शकते. पण जीवनशैलीशी निगडित या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या छोट्या-छोट्या उपाययोजना करुन या हवामान बदलाचा देखील मनमुराद आनंग घेऊ शकता.
डिहायड्रेशनची समस्या
मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा होण्याचा अधिक धोका असतो. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय करू शकतो. खूप जास्त डिहायड्रेशन असेल तर, तुम्हाला अतिरिक्त आधारभूत सल्ला आहे की इलेक्ट्रोलाइट्स देऊ शकतात.