Mental Health and Depression: मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी आणि अनेकांची कर्मभूमी अशी या शहराची ओळख. इथं सतत काही ना काही सुरु असतं. इथं प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या हेतूनं धावत- पळत असतो. ही मुंबई मुळातच तिच्या वेगासाठी आणि या वेगाशी ताळमेळ साधणाऱ्या इथल्या तितक्याच वेगवान नागरिकांसाठी ओळखली जाते. पण, या शहरातील एक मोठा वर्ग, किंबहुना या शहराचंच नव्हे तर या राज्याचंही भविष्यच सध्या एका मोठ्या समस्येशी दोन हात करताना दिसत आहे. ही समस्या आहे वाढत्या तणावाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात तणावग्रस्त तरुणांच्या संख्येत मोठी वाढ


सातत्यानं बदलणारी जीवनशैली, सततचा ताणतणाव या आणि अशा इतर काही कारणांमुळं मुंबई आणि महाराष्ट्रातील नैराश्यग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 


काय आहेत नैराश्य आणि तणाव वाढण्याची कारणं? 


झपाट्यानं बदलणारी जीवनशैली, चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवे, परीक्षेमध्ये येणारं अपयश, नोकरीच्या ठिकाणी असणारा कामाचा ताण, व्यवसायामध्ये येणारं अपयश आणि सतत लागून राहिलेली करिअरची चिंता अशा अनेक कारणांमुळे सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात तणाव आणि नैराश्याच्या परिस्थितीचा सामना करत आहे. 


हेसुद्धा वाचा : ये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग 


 


कामाचा प्रचंड ताण पाठीशी घेऊन वावरणाऱ्या या तरुण वर्गाला प्रचंड थकवा सतत जाणवत आहे, या साऱ्यामध्ये मात्र आपण मानसिक ताणावाचा सामना करत आहोत हीच बाब अनेकांच्या लक्षातच येत नाही. परिणामी या सततच्या तणावामुळे मानसिक खच्चीकरण होऊन ही मंडळी नैराश्याच्या गर्त छायेत जात आहेत. नैराश्याचा सामना करत असताना अनेकांना काही शारीरिक व्याधींचाही सामना करावा लागत आहे. इतकंच नव्हे, तर नैराश्याचा सामना करणारा मोठा वर्ग त्यांच्या मनात मानसिक आजार आणि मानसोरचारतज्ज्ञ यांच्याविषयी असणाऱ्या न्यूनगंडामुळं त्यांची मदत घेणंही टाळत असल्यामुळं ही समस्या सध्या गंभीर वळणावर असल्याचं दिसत आहे. 


तणाव, नैराश्याचा सामना करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची खास मोहीम 


राज्यातील नागरिकांना / तरुणांना तणावमुक्त करत त्यांच्या समस्या जाणून घेत त्या अनुषंगानं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘टेलिमानस’ सुविधा सुरु केली. या कॉल सेंटरवर वर्षभरात तरुणांनी सर्वाधिक संपर्क साधला. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात संपर्क साधत आपल्या समस्या मांडत त्यावर उपाय शोधण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचं आकडेवारीतून समोर आलं.