मुंबई : अनेकांच्या मते जीवनातलं अंतिम सत्य हे मृत्यू असतं. पण मृत्यू नंतर काय ? हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल.मरणापूर्वी काय दिसतं ? याबाबत अनेकांच्या मनात कुतुहल आहे. पण एका संशोधनातून मृत्यूपूर्वी तुम्ही काय पाहता ? याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  


मरणापूर्वी लोक काय पाहतात ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरणापूर्वी अनेक प्रकारचे व्हिजन दिसते. काहि अंधुक छाया दिसते. अनेकांच्या त्यांच्या खोलीच्या कोपर्‍यात काही अंधूक प्रतिमा दिसतात. काहींना या प्रतिमांमध्ये आपल्या प्रिय व्यक्ती दिसतात. काहींना त्यांना सोडून गेलेल्या मृत व्यक्तीदेखील दिसतात.  


कधी होतं असं ? 


वेगवेगळ्या प्रतिमा दिसणं, वेगवेगळ्या प्रतिमा एकत्र येऊन चित्र तयार होणं असा भास होतो. काहींना मरणाच्या काही तासांपूर्वी किंवा दिवसांपूर्वी हा भास होऊ शकतो. अकाली मृत्यू होणार्‍यांमध्ये  हा भास दिसत नाही.  


2020 पर्यंत मृत्यूचे कारण काय असेल ? 



2020 पर्यंत प्रिमॅच्युअर डेथचं प्रमाण वाढलेले असेल. यामध्ये हृद्यविकार आणि लिव्हरच्या आजाराचे दुखणे आणि त्यातून मृत्यूचे प्रमाण अधिक वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 


लठ्ठपणा अधिक गंभीर होणार  


आजकाल लठ्ठपणा ही समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आढळते. मेडिकल जर्नल लेंसेटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार 2020 हृद्यविकार आणि लिव्हरचे आजार गंभीर ठरण्याची शक्यता दाट आहे. कारण अल्कोहलचे सेवन वाढले आहे. सोबतच  लठ्ठपणा हे त्रास अधिक वाढत आहेत.