मुंबई : असे अनेक लोक आहेत. जे आपल्या केसांना मेहंदी लावतात, मग त्या स्त्रीया असो किंवा पुरुष. केसांना मेहंदी लावण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असू शकतात, ज्यामधील मुख्य कारण आहे पांढरे केस काळे करणे किंवा केसातील कोंडा कमी करणे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि ब्रँडचे मेहंदी पर्याय उपलब्ध आहेत. मेहेंदीमध्ये नैसर्गिक आणि आयुर्वेदिक गुण असल्यामुळे बरेच लोक काहीही विचार न करता आपल्या केसांना मेहंदी लावतात. परंतु असे असले तरी केसाला मेहंदी लावताना, तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत. चला तर जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसांना मेंदीलावताना लक्षात ठेवा या गोष्टी


लिंबाचा रस मिसळल्याने अनेक फायदे


मेंदीमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने अनेक फायदे होतात. तुम्ही देखील असे करत असाल, तर हे करू नका कारण असे केल्याने चेहऱ्यावर खोलवर डागही येऊ शकतात. त्याच वेळी, लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म देखील असतात, त्यामुळे ते मेहंदीसह वापरणे चांगले नाही.


मेंदी लावल्याने केस लाल होतात


मेंदी लावल्याने केस लाल होतात असा अनेकांचा समज आहे, पण हे बरोबर नाही. जर तुम्हाला केसांना गडद रंग हवा असेल तर तुम्ही आवळा वापरू शकता.


मेहंदी पावडर गोठवून ठेवा


जर तुम्ही मेहंदी वापरत असाल तर तुम्ही ती अजिबात गोठवू नये. जर तुम्ही त्याची पेस्ट तयार केली असेल, तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता. पण पावडर फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.


पाण्यात मिसळून मेहंदी लावणे


बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, मेहंदी ही फक्त पाण्यातच मिसळावी, परंतु तुम्हाला माहितीय का, की त्यात कॉफीचा किंवा चहाचा रसही घालू शकता. पण लक्षात ठेवा की मेहंदीमध्ये काहीही मिसळण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)