Physical relationship Side Sffects of Diabetes:  सध्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक सल्ले दिले जातात. आपण अनेकदा आरोग्यासंदर्भातील प्रश्न तज्ज्ञ किंवा डॉक्टरना विचार असतो. पण काही असे प्रश्न असतात ज्यावेळेस डॉक्टरना विचारणे कठीण होऊन जाते. मधुमेह आणि शारीरिक संबंध असाच एक विषय आहे ज्याविषयी अजूनही जनजागृती झालेली नाही. तुम्ही या विषयावर डॉक्टरांशी खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे. अनेकदा असे दिसून येते की लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते. (Myths and Facts Physical relationship Side Sffects of Diabetes Know what is true and what is false nz)


हे ही वाचा - 'चादर ओढून सीटवर ठेवले शारिरीक संबध' ; या 5 स्टार ज्यांनी  सांगितली स्वतःचीच 'ती' स्टोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



शारीरिक संबंधामुळे अनेक गोष्टींचा फायदा होत असतो. शारीरिक संबंध रक्तदाब कमी करण्यापासून तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. परंतु जर तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास होत असेल तर, शारीरिक संबंध तुमच्यासाठी तितके चांगले नसतील. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, मधुमेहामुळे तुमच्या लैंगिक संबंधांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.


जर्नल ऑफ डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित 2010 च्या अहवालानुसार, 50 टक्के पुरुष आणि 19 टक्के महिलांनी मधुमेह असूनही त्यांच्या लैंगिक जीवनातील समस्या डॉक्टरांना सांगितल्या नाहीत. अशा परिस्थितीत, हे फार महत्वाचे आहे की कोणत्याही संकोच न करता, डॉक्टरांना या प्रकरणाची सत्यता सांगा, जेणेकरून तुमच्यावर योग्य वेळी उपचार होऊ शकतील. चला जाणून घेऊया मधुमेहाची समस्या असल्यास शारीरिक संबंध ठेवावेत की नाही?


हे ही वाचा - Optical Illusion: 'या' फोटोत लपलाय गणितातला एक आकडा, 10 सेकंदात शोधून दाखवा



मधुमेहामध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या


मधुमेही रुग्णांचे शरीर कमकुवत असते, त्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान त्यांना ताठरतेमध्ये समस्या येतात. पण हे सामान्य आहे. ताठरपणाची समस्या दूर करण्यासाठी, आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील आवश्यक आहे. संशोधनानुसार, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 20 ते 75 टक्के पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो. त्याच वेळी, मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये सामान्य पुरुषांपेक्षा दोन ते तीन पट अधिक इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. त्याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.


हे ही वाचा - 'शुभ मंगल सावधान...' आलिया रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नासाठी तयार... 



मधुमेहामध्ये लैंगिक जीवन कसे सुधारावे?


मधुमेहाचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्याच वेळी, मधुमेहाचा लैंगिक जीवनावर देखील दुष्परिणाम होतो. अशा परिस्थितीत काही टिप्सचा अवलंब करून मधुमेहातील लैंगिक जीवन सुधारले जाऊ शकते.


उदाहरणार्थ, स्त्रियांनी मासिक पाळीच्या आधी आणि नंतर रक्तातील साखर तपासली पाहिजे. पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या असणे खूप सामान्य आहे. या समस्येत डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्वतः नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. डायबिटीज आणि डिप्रेशन मिळून तुमचे सेक्स लाईफ खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत, नैराश्य टाळण्यासाठी, स्वतःला व्यस्त ठेवा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. यासोबतच असे लोक मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेऊ शकतात.



(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)