'शुभ मंगल सावधान...' आलिया रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नासाठी तयार...

आम्रपाली दुबे तिच्या चित्रपटांसाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या सोशल मीडिया रील्ससाठीही आहे.

Updated: Nov 14, 2022, 05:52 PM IST
 'शुभ मंगल सावधान...' आलिया रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नासाठी तयार...  title=
Shubh Mangal Saavdhan famous actress Amrapali Dubey ready for marriage nz

Amrapali Dubey Video Reel: आम्रपाली दुबे ही भोजपुरीची जान आहे. ती नेहमीच तिच्या अदांजाने सगळ्यांना घायाळ करते. भोजपुरीमध्ये तिने चांगलाच ठसा उमटवला आहे. तिचा चाहता वर्ग ही तुफान आहे. तिची प्रत्येक शैली चाहत्यांना खूप आवडते. आम्रपाली तिच्या मोहक आणि सौंदर्याच्या जोरावर भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवत आहे. तिनं आपल्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. आम्रपाली दुबे तिच्या चित्रपटांसाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या सोशल मीडिया रील्ससाठीही आहे. अलीकडेच तिचा एक रील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लग्नासाठी बेताब दिसत आहे. (Shubh Mangal Saavdhan famous actress Amrapali Dubey ready for marriage nz)

हे ही वाचा - Optical Illusion: या फोटोमध्ये बैलाच्या मालकाला शोधून दाखला, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

आम्रपालीचा व्हिडिओ

भोजपुरी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री आम्रपाली दुबे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान, आम्रपालीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो इंटरनेट जगतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नाबद्दलची  स्पष्टपणे दिसत आहे. 

हे ही वाचा - अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आम्रपालीची शैली 

आम्रपालीने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची स्टाइल दाखवत आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. या क्लिपमध्ये आम्रपाली राजाजींना डोली लवकर आणण्याची विनंती करत आहे. व्हिडिओमध्ये देसी लूकमध्ये आम्रपाली खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या क्लिपला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेक चित्रपटांमध्ये वधूची भूमिका साकारणारी अभिनेत्री आम्रपाली अजूनही कुमारी आहे. लोक त्यांचे नाव दिनेश लाल यादव यांच्याशी जोडत असले तरी. मात्र ते फक्त चांगले मित्र असल्याचे दोघांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा - बॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?