गरोदरपणात तिखट जेवण खाल्याने खरंच होतो का बाळावर परिणाम? काय सांगतात तज्ज्ञ
यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाण्याचे डोहाळे का लागतात?
मुंबई : गरोदरपणात महिलांना कोणत्याही गोष्टी खाण्याची डोहाळे लागतात. आई जे काही खाते सगळं तिच्या पोटातील बाळाला देखील मिळतं, त्यामुळे असं बोललं जातं की, आईने गरोदरपणात चांगला आहार घ्यावा ज्यामुळे बाळाला त्याचा फायदा होईल आणि त्याची वाढ चांगली होईल. यादरम्यान महिलांना कधी गोड, कधी तिखट तर कधी आंबट अशा गोष्टी खाण्याची चव येते. पण अशा परिस्थीत अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न सतावतो की, स्त्रिया गरोदरपणात त्यांचे मन शांत करण्यासाठी मसालेदार किंवा तिखट अन्न खाऊ शकतात का? यामुळे खरंच बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचते का? यावर तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.
यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाण्याचे डोहाळे का लागतात?
असे होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे हार्मोनल बदल. याशिवाय खाद्यपदार्थांमधून येणारा सुगंध महिलांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा तीव्र करू शकतो.
गर्भधारणेदरम्यान मसालेदार अन्न सुरक्षित आहे का?
गरोदरपणात मसालेदार पदार्थ टाळावेत असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु तज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान, मसालेदार अन्न सेवन केल्याने बाळाला कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. पण याउलट अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्याने गर्भवती महिलेच्या पचनसंस्थेवर नक्कीच वाईट परिणाम होतो.
डॉक्टरांच्या मते कोणत्याही गर्भवती महिलेला मसालेदार अन्न खाण्याची इच्छा तिच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे असते. स्त्रीच्या डोहाळ्यांचा तिच्या मूलच्या इच्छेशी काहीही संबंध नाही.
गर्भधारणेदरम्यान, महिलांना मसालेदार आणि बाहेरील अन्न खाण्यास मनाई आहे, कारण त्याचा त्यांच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. वास्तविक, गरोदरपणात पचनसंस्था खूप मंद गतीने काम करते, त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. अशा परिस्थितीत मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने अपचन आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांची औषधेही वाढतात.
गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाताना ही खबरदारी घ्या
- गरोदरपणात मसालेदार अन्न खाण्यापूर्वी, तुम्ही वापर असलेले मसाले चांगल्या ब्रँडचे मसाले आहेत याची खात्री करा. जेणेकरून माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.
- जेवणात मसाले कमी वापरा.
-जास्तीत जास्त घरी शिजवलेले अन्न खा. बाहेरचे अन्न खावेसे वाटत असेल तर चव चाखा, पण तल्लफ शांत करण्यासाठी पोटभर जेवू नका. अन्यथा महिलेला उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
- जर तुम्हाला मसालेदार खावेसे वाटत असेल तर लिंबू आणि काळ्या मीठाची मदत घ्या.
-मसाले घेताना त्यांची एक्सपायरी डेट नक्की पहा.
- सुट्टे मसाले खरेदी करणे टाळा.
- मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर त्याचे सेवन ताबडतोब बंद करा.