साखरेला `४` हेल्दी पर्याय!
साखरेचा अतिवापर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते, हे सर्वश्रूत आहे.
मुंबई : साखरेचा अतिवापर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते, हे सर्वश्रूत आहे. पण साखर सोडणे शक्य होत नाही. मधुमेह असणाऱ्यांना साखर किंवा गोड खाण्यास मनाई आहे. अशावेळी हे पाच पदार्थ कामी येतील. पाहुया काही नैसर्गिक साखरेचे पर्याय जे साखरेपेक्षा कमी हानिकारक आहेत...
खजूर
खजूरात नैसर्गिक गोडवा असतो. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. जे पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. त्यामुळे खजूराचा आहारात समावेश करा. सलाडचे लहान लहान तुकडे दूधात घालून घ्या किंवा सलाडसोबत खजूर खा. तसंच खजूराची पेस्ट किंवा पावडर करून जेवणात साखरेऐवजी त्याचा वापर करा.
कोकोनट शुगर
साखरेपेक्षा हेल्दी असलेल्या कोकोनट शुगरमुळे शरीराला नुकसान पोहचत नाही. कोकोनट शुगरमध्ये आयर्न, झिंक सारखे पोषकघटक असतात.
अॅपल सॉस
अॅपल आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सर्वच जाणतात. त्यापासून बनणाऱ्या अॅपल सॉसचा वापर साखरेऐवजी करु शकता. हे हेल्दी असण्याबरोबरच टेस्टीही असते. मधुमेही देखील याचा वापर करू शकतात.
मध
पूर्वी साखरेपेक्षा मधाचा अधिक वापर होत होता. मात्र साखरमुळे मधाचा वापर कमी करण्यात आला. मधात अॅँटीऑक्सीटेंड सोबत इतर आवश्यक पोषकघटकही असतात.