मुंबई : केस पिकणे ही तशी वय वाढल्याची खूण. पण, आजकाल अगदी तरूणपणी किंवा त्याही पेक्षा कमी वयात अनेकांची केस, दाढी पिकलेली पहायला मिळते. याचा अर्थ त्यांचे वय वाढले नाही. मात्र, अनेकांना आपल्या पांढऱ्या दाढीमुळे गुणवत्ता असूनही आत्मविश्वासाच्या बाबतीत गडबडायला होते. म्हणूनच जाणून घ्या हे काही घरगुती उपाय. ज्यामुळे बसू शकतो आळा तुमच्या पिकत चाललेल्या पांढऱ्या दाढीला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्याचा रस - दोन समचे कांद्याच्या रसात पुदिन्याची पाने, आर्धा वाटी तूरडाळ आणि एक बटाटा एकत्र कुटा. त्याची पेस्ट दाढीच्या नाजूक केसांना लावा. तुमच्या दाढीचे केस हळूहळू काळे होऊ लागलेले दिसू शकतील.


पपईचा रस - पपईचा गर अर्धा वाटी काढून घ्या. यात चिमूटभर हळद टाका. त्यानंतर त्यात एक चमचा एलोवेराचा ताजा रस या मिश्रणात टाका. हे मिश्रण आपल्या दाढीला लावा. मग पहा कमाल.


प्रोटीनयुक्त अहार वाढवा - अनेकदा शरीरात प्रोटीन्सची मात्रा कमी असने हे सुद्धा दाढी पिकण्याचे महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. त्यासाठी दूध, दही, तूप, हिरव्या पालेभाज्या, डाळी आदिंचे सेवन करत चला.


आवळा - पिकण्याऱ्या दाढीवर आवळ्याचा रसही प्रभावी ठरतो. सलग एक महिना आवळ्याचा रस दाढीला लावल्यास दाढी काळसर व्हायला लागते.