मुंबई : बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यामधून मूळव्याधीचा त्रास बळावू शकतो. नियमित पोट साफ न झाल्याने आरोग्यावर आणि सोबतच त्वचेवरदेखील त्याचा परिणाम होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी बाजारात अनेक कडवट औषध घेऊन तुम्हांला कंटाळा आला असेल तर काही सहजसोप्या घरगुती उपयांनी त्यावर मात करणं शक्य आहे.  


योगासन - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईफस्टाईलशी निगडीत अनेक समस्यांमुळे त्यामधून आजारही वाढले आहेत. अशावेळेस आहारात आणि आपल्या जीवनशैलीत बदल केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येऊ शकते. 


पादोत्तानासन - 


बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी पादोत्तानासन फायदेशीर आहे. 


डाएट टीप्स - 


रात्री झोपण्यापूर्वी कपभर दूधामध्ये एक चमचा मध मिसळा. नियमित या मिश्रणाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक्षमता कमी होण्यास मदत होते. यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. 


सकाळी रिकाम्या पोटी अर्धा लिंबाच्या रसात काळं मीठ मिसळा. हे मिश्रण कोमट पाण्यासोबत प्यावे. यामुळे पोटाशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते. 


पपईमध्ये व्हिटॅमिन डी घटक मुबलक असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते. पोटाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. 


बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनी पिकलेला पपई, पेरू खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय


फायबरयुक्त भाज्या, फळं यांचं सेवन आरोग्याला फायदेशीर आहे. पालकची भाजी, त्याचा रसदेखील आरोग्याला फायदेशीर आहे. 


बद्धकोष्ठतेचा त्रास टाळायचा असेल पाव, मैद्याचे पदार्थ खाणं टाळा.