या नैसर्गिक उपायाने समूळ नष्ट करा वाळवीचा त्रास !
अनेक महागड्या फर्नीचरने आपण घर सजवतो.
मुंबई : अनेक महागड्या फर्नीचरने आपण घर सजवतो. अशामध्ये लाकडी कपाट, खूर्च्या, टेबल यांचा समावेश असतो. मात्र जर घरात वाळवीचा प्रवेश झाला तर या सार्या लाकडाच्या वस्तू अवघ्या काही दिवसात त्या पूर्णपणे खराब होऊ शकतात. तसेच वाळवीला वेळीच न रोखल्यास ती घरभर पसरण्याची भीती असते.
कशी दूर कराल घरातील वाळवी ?
वाळवी लागलेली वस्तू तात्काळ उन्हात ठेवा. ऊन हे वाळवीला नष्ट करते. त्यामुळे ठराविक दिवसांनी फर्निचर उन्हात ठेवा.
वाळवी लागलेल्या फर्निपासून वाळवीला दूर करण्यासाठी त्याजवळ ओला लाकडाचा बॉक्स ठेवा. यामुळे ओल्या लाकडाच्या वासाने वळवी येथे खेचली जाते. त्यानंतर हा बॉक्स जाळून टाका.
कडूलिंबाचे तेल वाळवीला हटवण्यासाठी मदत करते. वाळवी हटवण्यासाठी कडूलिंबाचे तेल थोडे अधिक दिवस घेत असली तरीही हा उपाय नियमित केल्यास फायदेशीर ठरू शकते.
बोरेक्स म्हणजेच सोडियम बोरेट फर्निचरला लावल्यास वाळवीचा नाश होण्यास मदत होते.
साबणाचं पाणीदेखील वाळवीवर फायदेशीर आहे. 4 कप पाण्यामध्ये डिश सोप मिसळा. हे मिश्रण फर्निचरवर शिंपडा. या मिश्रणानेही वाळवी दूर जाते. '
व्हाईट व्हिनेगरदेखील वाळवीला दूर करण्यासाठी मदत करते.