मुंबई : नियमित ब्रश करणं, जीभ स्वच्छ करणं यामुळे तोंडाचं आरोग्य जपण्यास मदत होते. तोंडाचं आरोग्य हे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. 


कडुलिंब - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडुलिंबामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने प्लाग जमा होणं, तोंडाला दुर्गंध येणं, कॅव्हिटीजचा त्रास होतो. कडूलिंब कडू असले तरीही यामुळे चव  सुधारण्याची सेंसिटीव्हिटी सुधारण्यास मदत होते. 


ज्येष्ठमध - 


ज्येष्ठमधामुळे तोंडात बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास, दात कमजोर होण्याचा धोका कमी होतो. रात्रभर ज्येष्ठमध पाण्यात भिजत ठेवा. या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशातील इंफेक्शन कमी होण्यास मदत होते. 


जांभूळ - 


जांभळामुळे तोंडातील कॅव्हिटी कमी करण्यास, डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. यामधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी घटक तसेच अ‍ॅन्टी कार्सिनोजेनिक घटक आहेत. यामुळे ओरल कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. 


बेलफळ - 


बेलफळामुळे माऊथ इंफेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होते. बेलफळ डाएजेस्टिव्ह ज्युस सोबतच टेस्ट सुधारण्यासही मदत होते. घशातील खवखव कमी करण्यास मदत होते.  


बाभूळ - 


बाभळीतील काही आरोग्यवर्धक घटक माऊथ अल्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात. यामधील अ‍ॅन्टीफंगल, अ‍ॅन्टी मायक्रोबियल गुणधर्म तोंडातील कॅव्हिटीजचा त्रास कमी करण्यास मदत करतात.