मुंबई : रात्री झोपेत लाळ निर्माण होण्याचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे अनेकजण सकाळी झोपेतून उठले की त्यांच्या चेहर्‍यावर, उशी आणि बिछान्यावर लाळ पसरलेली असते. लाळ अतिप्रमाणात स्त्रवणे हे काही आजारांचे संकेत आहेत. सोबतच काही पदार्थांच्या अ‍ॅलर्जीमुळे किंवा औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनदेखील लाळ अधिक प्रमाणात गळते. तुम्हांलाही हा त्रास असेल तर 'या' उपायांनी तुम्ही सहाजिकच त्यावर नियंत्रण मिळवू शकता.  


 कसे मिळवाल नियंत्रण ?


 लाळ अतिप्रमाणात निर्माण होत असेल तर पचायला अधिक वेळ लागणारे पदार्थ खाणं टाळावेत. सोबतच नियमित पोट साफ राहिल याची काळजी घ्या. याकरिता नियमित 2-3 तुळशीची पानं चावून खावीत. त्यावर थोडं पाणी प्यावे. दिवसभरात 3-4 वेळेस असं केल्याने अति लाळ वाहण्याचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 
 
 लाळगळतीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर तुरटी  पाण्यात मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे लाळगळतीच्या समस्येपासून तुमची सुटका होण्यास मदत होईल.  
 
 लाळगळतीचा त्रास असेल तर दालचिनीचा चहा प्यावा. दालचिनी पाण्यात मिसळा, उकळी आल्यानंतर पाणी गाळा. नंतर त्यामध्ये मध मिसळा. 
 
 लाळगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आवळ्याची पावडरदेखील फायदेशीर ठरते. रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाण्यात आवळ्याची पावडर मिसळा. या उपायाने पित्ताचा त्रासही आटोक्यात ठेवण्यास मदत होते.