भक्तीसोबत शक्तीही; वजन कमी करायची उत्तम संधी, नवरात्रीचे उपवास करून `असं` व्हा Slim
Weight Lose : भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरीही आहाराची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल.
Navratri Fast And Weight Lose : ज्यांना वजन कमी (Weight Lose) करायचे आहे, पण डाएट (Diet) आणि जिमला (Gym) जायचा कंटाळा येतो मग ही आहे तुमच्यासाठी बातमी...कारण नवरात्रीचे उपवास (Navratri Fast) करा आणि मस्त Slim व्हा. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय होऊ शकतं. तर नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2022 ) होते. नवरात्रीचे उपवास हे घरातील स्त्रींसोबतच अनेक पुरुषही करतात. मग जर घरात आई-वडिलांचा उपवास असेल तर तुम्हाला त्यांचासोबत उपवास करण्यास प्रोत्साहन मिळतो.
आता तुम्ही म्हणाल व्यायामाचं काय...तर नवरात्रीच्या 9 दिवस जर तुम्ही गरबा खेळायला जात असाल, तर तिथे तुमच्या शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होते. तीन चार तास सलग गरबा (Garba) खेळून तुमच्या व्यायाम होतो आणि घाम गळतो. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास फायदा होतो.
भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरीही आहाराची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल. जर तुम्ही योग्य पद्धतीने उपवास केला आणि डाएट योग्य ठेवल्यास तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो. (navratri 2022 Fasting And Weight Lose and amazing benefits of fasting NM)
या गोष्टींचा करा समावेश (Your Fasting Menu)
1. नारळ पाणी (Coconut water)
नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, कोलेस्ट्रॉल, आहारातील फायबर, फोलेट, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरीडॉक्सिन, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-के असतात. तुम्ही दिवसभरात एक ते दोन नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढेल.
2. भिजवलेले ड्रायफ्रुट्स (Soaked dry fruits)
उपवास करताना तुम्ही नाश्त्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. ते खाल्ल्याने तुम्हाला अनेक पोषक तत्वे मिळतील आणि त्यामुळे अशक्तपणा दूर होईल. सुका मेवा रात्री भिजवून त्यांचा आहारात समावेश करावा.
3. पपई (Papaya)
उपवास करताना अनेकदा पोट साफ न झाल्यामुळे त्रास होतो. अशा स्थितीत उपवासाच्या वेळी पपई खावी. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचे पोट स्वच्छ राहील आणि उपवास सोडल्यावर अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही दूर होईल.
4. दूध (milk)
दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि रिबोफ्लेव्हिनेज असतात. दूध प्यायल्याने तुम्हाला पूर्ण पोषण मिळते आणि ते प्यायल्यानंतर तुम्हाला भूकही लागत नाही.
5. पाणी कमी प्यायल्यामुळे...(Due to drinking less water)
अनेकांना मुळात पाणी कमी पिण्याची सवय असते. साधारण तहान लागली, काही खाल्लं की किंवा तिखटं लागलं की आपण पाणी पितो. पण उपवास असल्याने आपलं खाणं कमी होतं आणि त्यातच ते पदार्थ तिखट नसतात त्यामुळे आपण साहजिकच कमी पाणी पितो. खरं तर उपवास असल्यास पाणी पिण्यावर जास्त भर दिला पाहिजे.
6. फळं (fruits) खाण्यावर भर द्या
या 9 दिवसांच्या उपवासात फळांवर जास्त भर द्या. केळी, सफरचंद, पपई, अंजीर, पेर, चिकू या फळांचा समावेश करा. यामुळे आरोग्याला पोषण मिळण्यास मदत होते. फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. फळांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
7. दही (curd) नक्की खा
उपवासामुळे अनेकदा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी दही खाल्ल्यास पचनाशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि तब्येत चांगली राहावी यासाठी दह्याचा फायदा होतो.
8. ताक (Buttermilk) प्या हेल्दी राहा
उपवासामुळे पोट रिकामं आणि त्यात उपवासाचे पदार्थांमुळे खाल्ल्यामुळे अनेकांना acidity चा त्रास होतो. अशावेळी या 9 दिवसांच्या उपवासामध्ये ताक पिण्यावर भर दिला पाहिजे.
आता जाणून घेऊयात उपवास करण्याचे फायदे (Benefits of Navratri Fasting)
इंट्रोस्पेक्शन (Introspection) - नवरात्रीतील उपवासामुळे शरीराला आराम मिळतो आणि मनाची अस्वस्थता कमी होते.
शरीर स्वच्छ होतं (body is clean) - उपवासामुळे शरीरात पचनक्रिया बरोबर राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि शरीर स्वच्छ करण्यास मदत करते. तसंच शरीरातील सुस्ती कमी होण्यास मदत होते.
शरीर होतं डिटॉक्स (body Detox) - 16 तास काहीही न खाल्ल्यास सिस्टमला विश्रांती मिळते आणि शरीर डिटॉक्स होतं.
मेडिटेशन (Meditation) - उपवासामुळे मनाची चंचलता कमी होते, त्यामुळे ध्यान करणे सोपे जाते. तसंच शरीर शांत होण्यास मदत होते.