मुंबई : असं म्हणतात हे जीवन सुंदर आहे, आणि इतरांचं जीवन सुंदर करण्यात तुमचा वाटा नक्कीच असावा. तुमच्या ताटातला एका घासानं एखाद्याचं पोट भरु शकतं. तुमची एक छोटीशी मदत देखील एखाद्याचं आयुष्य जगण्याची भूक पूर्ण करु शकते. या लहानग्यावर मुंबईतील जेराबाई वाडिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका आजारानं या मुलाला ग्रासलं आहे. त्यात उपचारावरील खर्च वाढत जातोय. 


वडील यशवंत सत्यवान साळवे यांची परिस्थिती सध्या हालाखीची झाली आहे.  तर शक्य असल्यास, या दिवाळीला या मुलाच्या आयुष्याचा दीप तेवत ठेवण्यासाठी मदत करा. तुम्ही मदतीसाठी मन मोठं केलं तर नक्कीच..या मुलाची आपल्याप्रमाणे जगण्याची भूक पूर्ण होवू शकते, यासाठी हवाय तुमच्या ताटातला मदतीचा एक घास...