मुंबई : वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. तापमाणाचा पारा वाढल्याने त्वचारोग, डोकं दुखणे, थकवा जाणवणे यांसारख्या समस्या डोकं वर काढत आहेत. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असल्याचे समोर येत आहे. यापासून बचाव करण्यासाठी रोजच्या आहात बदल करण्याची अत्यंत गरज आहे. त्याचप्रमाणे कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे अतिश्य आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हापासून वाचण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. उन्हामध्ये अपायकारक पदार्थांपासून दूर राहणे आरोग्यस लाभदायक असते.   


उन्हाळ्यामध्ये कोणत्या पदार्थंचे सेवन करू नये :


१) जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे : अधिक मसाल्याचा वापरल्याने पदार्थाची चव १०० टक्के वाढते. पण हेच पदार्थ आपल्या आरोग्यास घातक ठरू शकतात. अधिक तिखट खाल्याने पोटाच्या समस्या वाढतात. अपचन आणि शरीरातील तापमान वाढते. 


२) मांसाहारी पदार्थ शक्यतो कमी खावे : उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मांसाहार केल्यास शरीरातील उष्णता वाढते. त्याचप्रमाणे पचनक्रिया सुद्धा मंदावते. 


३) फास्ट फूड : फास्ट फूडची चटक लागल्यामुळे अनेकदा पालेभाज्या, फळभाज्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. बच्चे कंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. पण हे फास्ट फूड आरोग्यास अधिक घातक आहेत. हिरव्या भाज्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.     


सध्याच्या वातावरणात शरीराला अधिक न्यूट्रिशनची गरज असते. त्यामुळे आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करणे आरोग्यास चांगले