मुंबई : नाती जपणं जितकं सोपं आहे, तितकंच ते कठीण देखील आहे. आता लोकांच्या नात्याची संज्ञा बदलली आहे. ज्यामुळे फार कमी वेळेत बरीच नाती तुटतात. त्यात लवकर तुटणारं नातं म्हणजे नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं. याचं सर्वात मोठं कारण, म्हणजे आजकाल नातं बनवताना, फक्त प्रेम बघितलं जातं. परंतु बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं, पण काही काळानंतर प्रेम संपुष्टात येऊन भांडणं वाढू लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा वेळी प्रेमासोबतच तडजोड, काळजी, एकमेकांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे या गोष्टींची सवय लावून घेणं गरजेचं आहे. परंतु बऱ्याच लोकांना या गोष्टीचं बँलेंस ठेवणं जमत नाही, ज्यामुळे ते अनेक चुका करतात आणि काही काळात हे नातं जास्त टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं नातं टिकवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या नात्यात या चुका करू नयेत.


नेहमी वाईट गोष्टींचा विचार करणे


कोणत्याही नात्यात वाद आणि भांडणं ही होतच असतात. काही लोक जुन्या गोष्टींचा विचार करत राहतात. हे आवश्यक नाही की, जर तुमचा पूर्वीचा अनुभव चांगला नसेल, तर भविष्यात देखील तसेच होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे भूतकाळातील अनुभव विसरून पुढे जावे. 


काही लोक एकमेकांना मनापासून क्षमा करू शकत नाहीत. अशा वेळी आपल्या जोडीदाराबद्दल वाईट विचार केल्याने तुमचे नाते आणखी बिघडू शकते. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या चुका माफ करा आणि आयुष्यात पुढे जा.


जुण्या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलणे


काही लोकांना अशी सवय असते की, ते नेहमी जुन्या गोष्टी दोघांमध्ये आणतात. बर्‍याच वेळा तुमची किंवा तुमच्या जोडीदाराकडून चूक झाली, तर तीच चूक सतत बोलून त्याला सारखं खाली पाडनं हे चूकीचं आहे. त्यामुळे ही चूक कधीही करु नका. यामुळे तुमचे नाते बिघडू शकते, कारण एखाद्याला सतत घालून-पाडून बोलल्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावतो.


नेहमी वाद घालणे


बहुतेक नात्यांमध्ये वादामुळे प्रकरण हात उचलण्यापर्यंत जातं. त्यामुळे गोष्टी आणखी बिघडतात. म्हणून सतत वाद घालू नये. उलट हे कसं टाळता येईल याकडे लक्ष ठेवा. तसेच एखाद्या गोष्टीवरुन वाद वाढला तर त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे कोणालाही दुख होणार नाही.


जोडीदाराला वेळ न देणे


अनेकदा एकमेकांना अजिबात वेळ न दिल्याने नातेसंबंध बिघडू लागतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण वेळ न दिल्यामुळे, संभाषण बऱ्याचदा होत नाही, जे हळूहळू गैरसमज आणि दुरावामध्ये बदलू लागते. एक वेळ अशी येते की नातं टोकापर्यंत पोहोचतं. त्यामुळे जोडीदाराला वेळ द्या.


नात्यातही सिंगल असल्यासारखे वागणे


तुम्ही जेव्हा सिंगल असतात, तेव्हा तुम्ही कसंही वागा. तो तुमचा हक्क देखील आहे. परंतु जेव्हा तुच्यावर एखाद्याची जबाबदारी असेल किंवा तुम्ही कोणाशी कमिटमेंटमध्ये राहात असाल, तर तुमच्या वागण्याने तुमच्या जोडीदाराला नक्कीच फरक पडतो. त्यामुळे तुमच्या नात्यात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून तुम्ही अविवाहित सारखे वागू नका. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्या जोडीदाराचं मत विचारात घ्या.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)