मुंबई :  मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे.  आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते. 


1. तूप आणि मध सम प्रमाणात घेऊ नका:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मध आणि तूप सम प्रमाणात घेणे टाळावे. कारण ते एकत्रित घेणे योग्य ठरणार नाही. हनी-ओट्स कूकीज किंवा मफिन्स यांसारख्या पदार्थांमध्ये मधासोबत कॅलरिफाइड बटर घातले जाते. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. काही आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्ल्यानुसार तूप आणि मध एकत्रित घेणे योग्य नाही. २:१ अशाप्रकारचे प्रमाण त्रासदायक ठरणार नाही. 


2. मुळा आणि मध:


आयुर्वेदानुसार मुळा आणि मध एकत्र केल्यास विषारी कंपाऊंड तयार होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे कॉम्बिनेशन हानीकारक असल्याचे जाते. म्हणून यापुढे सलाड मध्ये मध घालताना त्यात मुळा नसेल याची खात्री करा. 


3. मांसाहार आणि मध:


अलीकडे सामान्यपणे रोस्टेड मासांहारी पदार्थांवर मध घालून खाण्याचा ट्रेन्ड आहे. परंतू मध आणि मटण व त्याचे पदार्थ हे कॉम्बिनेशन विसंगत आहे. हे परस्पर विरोधी पदार्थ एकत्रित खाल्यास आरोग्यास हानीकारक ठरतात.


4. गरम पाणी आणि मध:


साधारपणे पदार्थाला गोडवा आणण्यासाठी त्यात मध घातले जाते. परंतु, डॉ. भगवती यांच्या सल्ल्यानुसार मध गरम पाण्यात आणि पदार्थांमध्ये घालणे टाळावे. मध नुसते घेणे आरोग्यासाठी अमृत ठरते. तर शिजवलेले मध हानिकारक असते. अभ्यासानुसार मध ६० अंशापर्यंत गरम केल्याने hydroxymethyl furfuraldehyde (HMF) याची निर्मिती होते आणि ते आरोग्यासाठी विषारी ठरते.