परदेशी प्रवासासाठी CoWIN पोर्टलवर नवीन प्रमाणपत्र, कसं कराल डाउनलोड?
आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता CoWIN पोर्टलवर वेगळं प्रमाणपत्र मिळणार आहे.
मुंबई : आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता CoWIN पोर्टलवर वेगळं प्रमाणपत्र मिळणार आहे. CoWIN पोर्टल अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी खुले झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक तत्त्वांनुसार जारी केलेलं नवीन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
सर्टिफिकेटमध्ये असणार या नवीन गोष्टी
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लसीकरणाच्या प्रमाणपत्रात DOB (वर्ष-महिना-दिवस) स्वरूपात लिहिलं असेल. त्याचप्रमाणे प्रमाणपत्रात युनिक आयडी देखील असणार आहे. या प्रमाणपत्रावर लसीच्या नावासह लसीचा प्रकारही लिहिण्यात येणार आहे. जसं की- Covaxin- Inactivated Virus Vaccine, Covishield- Recombinant Adenovirus Vector Vaccine.
प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केलेले हे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. असं डाऊनलोड करा सर्टिफिकेट-
सर्वप्रथम तुम्हाला Cowin.gov.in वेबसाइटवर जावं लागेल
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून लॉग इन करा
पासपोर्ट क्रमांक आणि पासपोर्टमध्ये लिहिलेली DOB: yyyy/mm/dd ते फॉरमॅटमध्ये लिहून सबमिट करावं लागेल.
पेज रिफ्रेश होताच, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केलेलं लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात डाउनलोड केलं जाईल.