कोण म्हणतं स्वभावाला औषध नाही, महिलांचा स्वभाव बदलण्यासाठी प्रभावी औषध बाजारात
विज्ञानाने इतकी प्रगती केलेय की महिलांच्या स्वभावावर देखील औषध शोधून काढलयं. हे औषध खरचं प्रभावी आहे का? जाणून घ्या.
medicine for change the women nature :कोण म्हणतं स्वभावाला औषध नाही.. महिलांचा स्वभाव बदलण्यासाठी चक्क बाजारात नवं औषध आलंय. नेमकं काय आहे हे औषध? आणि त्यामुळंच खरंच महिलांचा स्वभाव बदलू शकतो?
एका गोळीमुळे बदलणार महिलांचा स्वभाव
स्वभावाला औषध नाही, असं म्हणतात.. मात्र चक्क स्वभाव बदलण्याचं प्रभावी औषध बाजारात आलंय. हे औषध महिलांसाठी असणाराय. प्रसुतीनंतर काही महिला चिडचिड्या होतात. त्यांच्यावरचा मानसिक ताण वाढतो. त्याला पोस्टपार्टम असे म्हणतात. निराशावस्थेत महिलांच्या मनात आत्महत्येचे विचारही येतात. त्यांच्या मनावरचा हा ताण दूर करणारी जुजुर्वे नावाची गोळी बाजारात आलीय.
अमेरिकेच्या एफडीएनं दिली औषधाला मंजुरी
अतिशय निराश असलेल्या महिलांना ही गोळी 14 दिवस घेतली की, त्यांची निराशा दूर होऊ शकते, त्यांची चिडचिड कमी होऊ शकते, असा दावा करण्यात आलाय. अमेरिकेच्या एफडीएनं म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनानं जुजुर्वे गोळीला मंजुरी दिलीय. मात्र या गोळीचे अनेक दुष्परिणाम असल्याचंही समोर आलंय..
स्वभावाला औषध असतं
जुजुर्वे गोळी घेतल्यानंतर चक्कर येणे, थकवा, सर्दी, खोकला, मूत्रसंसर्ग असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळं ही गोळी घेतल्यानंतर पुढील 12 तास शारीरिक कष्टाची कामे करू नयेत. शिवाय गोळी घेतल्यानंतर वाहन चालवण्यासही मनाई करण्यात आलीय. स्तनपान करणा-या महिलांवर जुजुर्वे गोळ्यांचा काय परिणाम होतो, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं केवळ मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांनीच या गोळ्या लिहून द्याव्यात, असं अमेरिकेत ठरलंय.
औषधाचा खरंच परिणाम होतो का?
मासिक पाळी येण्याच्या काळात, बाळंतपणानंतर किंवा वाढत्या वयासोबत महिलांचे मूड स्वींग वाढत जातात. अशा महिलांची चिडचिड दूर होण्यासाठी ही गोळी फायदेशीर ठरणार आहे. मात्र, या औषधाचा खरंच परिणाम होतो का, याची सविस्तर तपासणी करूनच मग या औषधाचा वापर वाढायला हवा. नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था व्हायची.