दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट समोर आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूच्या B.1.1.1.529 या नवीन व्हेरिएंटबाबत आता भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून परदेशातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी कोविड-19च्या या नव्या व्हेरिएंट हा म्युटेशन शोधल्याचा दावा केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि त्याच्या शेजारच्या बोत्सवानामध्ये कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटची प्रकरणं आढळून आली आहेत.


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जोखीम असलेल्या देशांमधून भारतात प्रवास करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात यावं. ही प्रकरणं ओळखली गेली पाहिजेत आणि त्यांची चाचणी केली पाहिजे."


या पत्रामध्ये मंत्रालयाने उच्च जोखमीच्या देशांमधून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांवर ट्रॅक ठेवण्याचे आणि आणि चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 


राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना नवीन व्हेरिएंटसाठी सकारात्मक चाचणी करणाऱ्या प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवले जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.