तुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी `ही` बातमी वाचा
Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे.
Health News : आपल्या आजूबाजूला पाहिलं आहे की, टपरीवरील चहा हा प्लॅस्टिकच्या पिशवीत दिला जातो. तर अनेक खाद्यपदार्थ हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूज पेपरमध्ये बांधून दिली जातात. आपणही अनेक वेळा पोळी आणि भाजीसाठी पेपर आणि फॉइलचा वापर सर्रास करतो. पण आपली ही पद्धत आपल्या जीवाशी खेळ आहे. फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवणे त्वरित थांबवलं पाहिजे, असं आवाहन FSSAI ने केला आहे. (news paper aluminum foil for wrapping food dangerous fssai warning side effects)
वृत्तपत्रासाठी वापरली जाणारी शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो.
प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येता. त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. FSSAI ने सांगितलं की, त्याशिवाय जीवाणू, विषाणू देखील कागदावर मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन तुमच्या गंभीर आजार होऊ शकतो.
तुमची पाचन समस्या बिघडून तुम्हाला विषबाधा होण्याची शक्यता असते. तुम्ही वरच्यावर अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं तर तुम्हाला पोटाचा विकार होऊ शकतो. यातून भविष्यात कर्करोगाचा धोका वाढतो, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. वृद्ध आणि लहान मुलं यांना अशा पदार्थ दिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असतं त्यामुळे या लोकांना सर्वाधिक धोका निर्माण होतो.
त्याशिवाय आज काल अनेक जण प्लॅस्टिक आणि फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यातूनही रसायन अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील अन्न खाणे तुम्हाला महागात पडू शकतं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसंच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे.