मुंबई : इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार केरळमध्ये दहशत पसरवणार्‍या निपाह व्हायरसमागे वटवाघूळ आहे. एका रिपोर्टच्या अहवालानुसार, संशोधकांना त्यासाठी आवश्यक पुरावेदेखील सापडले आहेत. 


निपाहने घेतले 17 बळी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळ राज्यात कोझिकोड, मल्लापुरम भागात निपाहमुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांनी ज्या वटवाघुळांवर चाचणी केली त्या चाचण्या पॉझिटीव्ह ठरल्या आहेत. दरम्यान  मागील काही चाचण्यांमध्ये वटवाघूळ हे निपाहचं कारण नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या जीवघेणा आजारामागील कारण शोधण्याचं आव्हान संशोधकांसमोर होते.   


कसे झाले निदान? 


नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हाय सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिजने मे महिन्यामध्ये कोझिकोडच्या ग्रामपंचायतीतील चंगारोथमधून काही नमुमे घेण्यात आले होते. हे नमुने मांसाहारी वटवाघुळाचे होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये निपाह व्हायरसचे निदान झाले नाही. फ्रुट बॅट्स जातीचे वटवाघूळ निपाह व्हायरस पसरण्यामागील प्रमुख कारण असतो. कारण त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या या व्हायरसचा प्रवाह होतो. दुसर्‍यांदा करण्यात आलेल्या चाचणीमध्ये फ्रुट बॅट्स ( शाकाहारी वटवाघुळ) ची चाचणी करण्यात आली. त्यानंतर या व्हायरसमागील कारणाचं निदान झालं आहे. 48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस


55 वटवाघुळांवर झाली तपासणी  


इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांनी केलेल्या चाचणीनुसार पहिल्या बॅचमधील 21 वटवाघूळ हे मांसाहारी होते. त्यामध्ये निपाहचे लक्षण सापडले नाही. तर दुसर्‍या बॅचमधील 55 वटवाघूळांवर  चाचणी  करण्यात आली. हे वटवाघूळ  फ्रुट बॅट्स जातीचे होते. त्यांचा रिपोर्ट सकारात्मक आला आहे.   निपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय ..


खजूरामुळे व्हायरस पसरला 


केरळमध्ये पसलेल्या 'निपाह' मागे फ्रुट बॅट्स जातीचे वटवाघूळ आहे. त्यामुळे 17 जणांनी जीव गमावला आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार, खजुराची शेती करणार्‍यांमध्ये या व्हायरसचा धोका अधिक असतो. 2004 साली    बांग्लादेशमध्येही या व्हायरसची दहशत पसरली होती.  निपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका I