मुंबई : केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचा धोका वाढत आहे. हा व्हायरस पसरण्यामागे वटवाघूळ  असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा बाधित वटवाघूळ ही फळं खातात तेव्हा त्यांची लाळ फळांमध्ये राहते. ही दुषित फळं जेव्हा इतर प्राणी आणि माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा 'निपाह' व्हायरसचा संसर्ग त्यांच्यामध्ये पसरतो. केरळमध्ये निपाह व्हायरसने 10 जणांचा बळी घेतला आहे.  


 वटवाघूळांची दहशत  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अफ्रिकी देशामध्ये जाम्बिया येथील नॅशनल पार्कमध्ये ऑक्टोबर महिन्यात अचानक 1 करोडहून अधिक वटवाघूळ येतात. या काळात फळं अधिक प्रमाणात येतात. मासुकू, मिर्टन  फळांप्रमाणेच आंबा किंवा केळं या फळांचादेखील वटवाघुळं आस्वाद घेतात.  


 सर्वाधिक वटवाघूळ आढळतात  


 आफ्रिकी न्यूजला माहिती देताना कासान्का नॅशनल पार्कचे प्रमुख डियॉन स्कॉट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जसा ऋतू सुरू होतो तसे वटवाघुळांचेही आगमन सुरू होते. सस्तन प्राण्यांचे अशाप्रकारे एकत्र येणं हे पहिलेच आहे. या पार्कमधील फळात असे काय आहे? की ज्यामुळे करोडो वटवाघूळ आफ्रिकन नॅशनल पार्कमध्ये एकत्र येतात हे ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


अनेक गावांवर सावट 


एकीकडे वटवाघुळांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये वटवाघुळांमुळे पसरणार्‍या आजारापासून बचावण्यासाठी जादुटोणा केला जात आहे.  


इको सिस्टिमसाठी आवश्यक 


वटवाघुळांमुळे 'निपाह' व्हायरस पसरत असला तरीही त्यावर उपाय म्हणून वटवाघुळ नष्ट करणं हा उपाय असू शकत नाही. इकोसिस्टिम संतुलित राहण्यासाठी वटवाघुळ आवश्यक आहे.