#NoBraDay : तुम्ही वापरताय त्या Inners चा इतिहास माहितीये? वाचा नेमकी कुठून झाली सुरुवात
#NoBraDay : सुरुवातीला जो प्रकार ब्रा म्हणून वापरला जात होता तो पाहून धक्का बसेल... कारण त्यामुळं नसणारे त्रासही ओढावले जात होते.
#NoBraDay : ऐकून आश्चर्य वाटेल, काहींना धक्काही बसेल. कारण, आज (13 ऑक्टोबर) आहे No Bra Day. या दिवसासाठी 13 तारीखच निवडली जाण्याचं कारण म्हणजे हा महिन्यातला बरोबर मध्यावर येणारा दिवस. ऑक्टोबर महिना International Breast Cancer Awareness Month म्हणून जगभरात ओळखला जातो. या महिन्यात स्तनांच्या कर्करोगासंदर्भात जनजागृती केली जाते. तर, या महिन्यात 'नो ब्रा डे' साजरा केला जातो कारण महिलांना ब्रापासून मुक्ती मिळावी आणि त्यांनी आपल्या शरीराचा, स्तनांचा स्वीकार करावा. Breast Cancer विषयी प्राथमिक लक्षणआंमध्येच माहिती मिळाल्यास सहजपणे या आजारावर मात करता येते यासाठीच जगभरात हे दिवस साजरा केले जातात.
'नो ब्रा डे'चं ठीक; पण तुम्हाला माहितीये का 'ब्रा' (Bra) चा वापर महिलांनी केव्हापासून सुरु केला?
आजच्या युगात आम्हाला ब्रा घालायला आवडते असं फार क्वचितच महिला म्हणतील. कारण, खुलेपणानं त्या या मुद्द्यावर व्यक्त होत नसल्या तरीही या एका Bra मुळं त्यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. खरंतर महिलांनी ब्रा वापरण्यास सुरुवात केव्हापासून केली, याची माहिती सर्वांनाच असणं गरजेचं. चला तर मग, थोडं भूतकाळात डोकावूया.
अधिक वाचा : हे आधी माझ्यासोबत घडलंय... तुम्हीही असं म्हणता का? पाहा काय आहे Déjà vu प्रकरण
'ब्रा'चा इतिहास एकदा पाहाच... (What is the history of bra?)
साधारण 500 वर्षांपूर्वी महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या नावात आणि ठेवणीत बदल झाला. ज्याप्रमाणं हल्ली कफ्ड, वायर्ड, ट्यूब ब्रा वापरल्या जातात त्याप्रमाणे कैक शे वर्षांपूर्वी महिला चामड्यापासन तयार करण्यात आलेली अंतर्वस्त्र वापरत होत्या. इजिप्तमध्ये याची सुरुवात झाल्याचे काही पुरावे आहेत. भारतात याची सुरुवात ब्लाऊजपासून झाली होती. असं म्हणतात की इसवीसपूर्व 6 व्या शतकापासून, हर्षवर्धनाच्या काळात झाली होती. चोळीपासून भारतात ब्रा ही संकल्पना अस्तित्वात आली असं सांगण्यात आलं होतं.
कुणी कॉर्सेटही वापरलं....
तुम्हाला माहितीये का, धातूपासून तयार करण्यात आलेलं आणि कमरेबारून स्तनांपर्यंत वापरलं जाणारं एक आवरणही महिला वापरत होत्या. 12, 19 व्या शतकाच त्याचा वापर होत होता. पण, हे कॉर्सेट सर्वांनाच वापरता आलं नाही, काही महिलांना यामुळं पोटदुखी, श्वसनाचे त्रास आणि गुदमरल्यासारखं वाटत होतं ज्यामुळं हा वापर तिथेच थांबला.
अधिक वाचा : No Bra Day : काळ्या रंगाची ब्रा घातल्याने होतो कॅन्सर? जाणून घ्या सत्य
तो दिवस जेव्हा brassiere तयार करण्यात आली....
बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार फ्रान्समध्ये 'मॉडर्न ब्रा'चा जन्म झाला. तिथं तेवा brassiere हा शब्द शरीराच्या वरील भागासाठी वापरण्यात आला होता. 30 मे 1869 ला फ्रान्समध्ये हर्मिनी कैडोलनं कॉर्सेटला दोन तुकड्यांमध्ये विभागून त्यापासून अंतर्वस्त्र तयार केली. पुढे त्याचाच वरील भाग Bra म्हणून वापरला जाऊ लागला.
काळ पुढे गेला, चित्रपटांमध्ये 1920 च्या सुमारास सेमी कप ब्राचा वापर होऊ लागला. पुढे वीस वर्षांनी ब्रा विक्रीसाठी उपलब्ध झाल्या, 1975 मध्ये स्पोर्ट्स ब्रा हा प्रकार वापरात आला आणि आजच्या घडीला या Bra ची नानाविध रुपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ब्रा वापरावी की नाही, यावर आजही मोठा वाद आहे. तुमचं याविषयी काय मत?