मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. आजकाल तरूण मुलींमध्येही या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. अशातच या कॅन्सरबद्दल महिला आणि मुलींच्या मनात अनेक गैरसमज आहेत. यातीलच एक गैरसमज म्हणजे काळ्या किंवा डार्क रंगाच्या ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. यामध्ये किती तथ्य आहे, हे आज आपण No Bra Day च्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक मेसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, काळ्या रंगाची ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका वाढतो. अशा मेसेजमुळे अनेक महिलांनी काळ्या रंगाची ब्रा घालणं बंद केलं.
यामध्ये असा दावाही करण्यात आला होता की, सूर्याची किरणे थेट स्तनांवर पडली तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया.
चुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात; आजच सावध व्हा
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, ही निव्वळ एक अफवा आहे. ब्राच्या रंगामुळे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होईल की नाही याने काही फरक पडत नाही. मुळात महिलांना ज्या रंगाची ब्रा घालायची आहे ती परिधान करावी. त्यामुळे महिलांनी अशा मेसेजसकडे आणि अफवांकडे लक्ष देऊ नये
सोशल मीडिया डॉ. तान्या यांनी एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टद्वारे त्या म्हणाल्या, "काळ्या रंगाची किंवा कोणत्याही डार्क रंगाची ब्रा घातल्याने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? अनेकदा याबाबत ऐकले असेल आणि इतरांना सांगितलं असेल की, काळ्या रंगाची ब्रा घातल्याने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. कारण स्तन उष्णता शोषून घेतात. त्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पण यात तथ्य नाही"
“काळ्या रंगाची ब्रामुळे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. त्यामुळे अशा गैरसमजुतींकडे लक्ष देऊ नये."
चुकीच्या साईजच्य ब्रा वापरल्याने महिलांना नंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पाठदुखी, खांदेदुखी, रॅशेज तसंच आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यापासून मुक्ती हवी असल्यास महिलांनी योग्य साईजची ब्रा वापरली पाहिजे.