दिल्ली : देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतेय. शिवाय सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरत असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला. असं असूनही रूग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. यावर आता जागतिक आरोगय संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोनाला आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत त्यांनी माहिती आहे. यावेळी डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये. भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशांनी या व्हायरसला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवलं पाहिजे”


डॉ. स्वामीनाथन पुढे म्हणाल्या, “सार्वजनिक ठिकाणी जे जाहीर कार्यक्रम होतात. हे कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत आहे. अशा जाहीर कार्यक्रमांमुळे तसंच मनोरंजनाच्या कोरोना मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणं हे गरजेचं आहे."


मात्र यावेळी देशातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहिलं पाहिजे, असं डॉ. सौम्या यांनी सांगितलंय.


सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 1431 इतकी पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 454 रुग्ण आढळून आल्याने चिंता अधिक वाढलीये. देशातील तब्बल 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे.


गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 22,775 रुग्ण आढळले आहेत, तर 406 जणांचा मृत्यूंची नोंद करण्यात झाला आहे. सध्या देशात कोरोनाचा एक्टिव्ह रुग्णसंख्या 1,04,781 आहे. तर रिकव्हरी रेट 98.32% वर आहे.