गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
तर गव्हाच्या रोटीऐवजी तुमच्या आहारात बेसनाच्या रोट्याचा समावेश करून पहा.
Benefits of Besan Roti: अनेकदा गव्हाच्या किंवा मैद्याच्या पोळ्या (Wheat Roti) खाण्यापेक्षा आपल्या नाचणीच्या किंवा बाजारीच्या भाकऱ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु प्रत्येकाला भाकऱ्या जमतीलच असं नाही तर किंवा भाकऱ्या खाणंही अनेकदा जमतंच असं नाही. त्यामुळे याला पर्याय म्हणून काय खाता येईल असा प्रश्न अनेकांना पडतो. चण्याच्या पिठाचा वापर आपल्या स्वयंपाक घरात हा असतोच असतो. बटाटे वडे नाहीतर भजी बनवण्यासाठी आपण चण्याच्या डाळीचा उपयोग करतो तेव्हा हीच चण्याची डाळ तुम्हाला गव्हाच्या पोळीऐवजी फायदेशीर ठरू शकते.
आणखी वाचा - अतरंगी फॅशमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंग सोशल मीडियावर ट्रेंडिग; यावेळचं कारण मात्र वेगळं
बेसन रोटी म्हणजेच चण्याच्या डाळीच्या पोळ्या (Besan Roti) शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर गव्हाच्या रोटीऐवजी तुमच्या आहारात बेसनाच्या रोट्यांचा समावेश करून पहा. बेसन खाल्ल्याने वजन कमी होण्यासोबतच पचनक्रिया मजबूत होते तेव्हा बेसन रोटीमध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यास मदत -
बेसनाची भाकरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. बेसनामध्ये कार्बोहायड्रेट, लोह आणि फायबर (Fiber) असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गव्हाऐवजी बेसन खाल्ल्यास शरीरात चरबी जमा होत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही. कारण बेसनाची रोटी खाल्ल्याने काही काळ भूक लागत त्यामुळे तुम्ही बाहेरचंही खाणं टाळू शकता.
अशक्तपणापासून आराम -
बेसन खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो कारण बेसन रोटीमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते जे शरीरातील कमजोरी दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर बेसनाची रोटी शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासही मदत करते.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते -
बेसनाची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. बेसन रोटीमध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन (Protein) असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर तुम्हीही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात बेसनाच्या रोट्याचा समावेश करू शकता.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)