आता तुमच्या हातातील मोबाईल करणार कोविड टेस्ट
तंत्रज्ञानाचा वापर करून लोक आता स्मार्टफोनच्या मदतीने कोविड-19 चाचणी करू शकणार आहेत.
मुंबई : जवळपास गेल्या 2 वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाशी लढा देतोय. कोविड-19 चाचणीबाबत केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील देशांमध्ये लोकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. अशा परिस्थितीत लोकांची ही समस्या कमी करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका संशोधकांनी कोरोनाच्या टेस्टचं नवीन तंत्र शोधून काढलंय. या तंत्रज्ञानाचा वापर करून लोक आता स्मार्टफोनच्या मदतीने कोविड-19 चाचणी करू शकणार आहेत.
समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, या संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड-19 चाचणीच्या नव्या पद्धतीची अचूकता पीसीआर चाचणीच्या बरोबरीची आहे. या पद्धतीच्या वापरासाठी तुम्हाला फक्त एक स्मार्टफोन, एक अॅप आणि काही मूलभूत लॅब उपकरणं आवश्यक आहे.
स्मार्टफोनने होणार कोरोना टेस्ट
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांच्या टीमने JAMA नेटवर्क ओपन जर्नलमध्ये एक पेपर प्रकाशित केलाय. कोरोना चाचणीच्या या नव्या पद्धतीला smaRT-LAMP (Loop-mediated Isothermal Amplification) असं नाव देण्यात आलंय. या टेस्टिंगच्या सिस्टिमला स्थापन करण्यासाठी तुम्हाला 100 डॉलरपेक्षा कमी खर्च करावा लागेल. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे.
कशी होणार ही कोरोना टेस्ट
यासाठी तुम्हाला प्रथम साध्या उपकरणांची आवश्यकता असेल जसं की हॉट प्लेट, रिअॅक्टिव्ह सोल्युशन आणि टेस्ट किट बसवण्यासाठी स्मार्टफोन. यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर Bacticcount नावाचं फ्री अॅप डाउनलोड करा. ज्या व्यक्तीची चाचणी करायची आहे त्यांच्या लाळेचे नमुने किटमध्ये लोड करावी लागेल.
हे नमुने रिऍक्टिव्ह सोल्युशनमध्ये टाकलं जातं. या प्रक्रियेला Loop-mediated Isothermal Amplification किंवा LAMP म्हणतात. यानंतर सँपल कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवला जातो. ज्यामध्ये वरच्या बाजूने LED लावण्यात आलेला असतो. त्यानंतर स्मार्टफोनच्या कॅमेर्यासह बॉक्सच्या टॉपमध्ये सँपल पाहिला जाईल. त्यावेळी द्रवाचा रंग बदलतो तेव्हा चाचणी नकारात्मक आहे की सकारात्मक हे कळेल.
जर तुमच्या नमुन्यात पॅथेजन असतील, तर त्याचा रंग लाल होईल. जितके जास्त पॅथेजन असतील तितक्या लवकर Bacticount अॅप रंग दाखवेल. लाळेच्या नमुन्याचा रंग बदलण्याच्या गतीच्या आधारावर व्यक्तीच्या व्यक्तीच्या वायरल लोडचा अंदाज लावला जातो.