मुंबई : आजकाल अनेक लोकांची जीवनशैली चुकीची असते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल शरीरात वाढू लागतं. सध्या प्रत्येकाने त्यांच्या लाईफस्टाईलवर लक्ष द्यावं लागतं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, ब्लड प्रेशर वाढतं आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी शरीरात दोन पद्धतीचं कोलेस्ट्रॉल असतं. जर खराब कोलेस्ट्रॉल रक्तांच्या नसांमध्ये जमा होऊ झालं तर त्यामुळे नसा ब्लॉक होतात. अशावेली हार्ट अॅटॅकचा धोका वाढून परिस्थितीत जीवावर बेतू शकते. खराब कोलेस्ट्रॉल निघून जावं यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत.


खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण


एका रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, 20 पेक्षा जास्त वयाच्या महिला आणि पुरुषांमध्ये एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल 100 मिलीग्रॅम पेक्षा कमी असली पाहिजे. 


या गोष्टींनी होईल कमी


  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आवळा हा सर्वात उत्तम मानला जातो. जर तुम्ही दररोज आवळा खाल्ला तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी बॅलन्स राहण्यास मदत होते. 

  • जिरे, धणे आणि बडीशेप तुमच्या डाएटमध्ये असावी. यामुळे कोलेस्ट्रॉल नियमित राहण्यास मदत होते. 

  • तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, लसूणीच्या सेवनाने देखील कोलेस्ट्रॉल नियमित राहतं. 

  • अनेकांना याची माहिती नसेल मात्र लिंबू देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. लिंबाचा वापरही डाएटमध्ये जरूर करा. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल बाहेर निघेल.