COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : तुम्ही प्रामाणिकपणे डाएट करायचं ठरवता.... दोन दिवस डाएट उत्तम साधलंही जातं आणि नेमकं तिसऱ्या दिवशी तुमचे जवळचे मित्रमैत्रिणी रेस्टॉरंटमधली पार्टी ठरवतात. अशी अडचण आलीच तर तुमच्या मदतीसाठी एफडीए धावून आलीय... कशी बघुयात...


असे एकाहून एक लज्जतदार पदार्थ समोर आले की डाएट गेलं चुलीत, असं होऊन जातं. घरी स्वयंपाक करताना मोजून मापून तेल घातलं जातं. तोलून मोलून कॅलरींचा विचार केला जातो. पण हॉटेलमध्ये पदार्थ समोर आले की त्यावर ताव मारला जातो. पण आता हॉटेलमध्येही तुम्ही काय खाताय, त्यामध्ये किती कॅलरी आहेत, हे तुम्हाला कळू शकणार आहे. हॉटेलमधल्या मेन्यूकार्डवर किमतीबरोबरच पदार्थांमधल्या कॅलरी लिहिणंही बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीनं एफडीएची राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे.. त्यासाठी आधी रेस्टॉरंट संघटनांशी चर्चा केली जाणार आहे... 


बदलत्या जीवनशैलीमुळे रोगांचं प्रमाण वाढतंय. २०३० मध्ये भारतात ८ कोटी लोकांना मधुमेह होण्याचा अंदाज आहे. जंक फूडचा सगळ्यात वाईट परिणाम लहान मुलांवर होतो. 


फूड सेफ्टी रेग्युलेटर FSSAI देशभर जंकफूडविरोधात जागृती करतंय. पण अजून त्यामध्ये बरंच काही होणं गरजेचं आहे. आता हॉटेलमध्ये मेन्यूकार्डच्या बाजूला कॅलरी लिहिणं बंधनकारक करणं, हा त्यासाठीचाच एक प्रयत्न आहे.