मुंबई : भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची प्रकरणं वाढायला लागली आहेत. ओमायक्रॉनच्या 309 नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे आतापर्यंत देशात ओमायक्रॉनच्या एकूण 1270 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमायक्रॉनची 1270 प्रकरणं समोर आली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 450 प्रकरणं आहेत. यानंतर दिल्लीत 320, केरळमध्ये 109 तर गुजरातमध्ये 97 रुग्ण आढळून आले आहेत.


64 दिवसांनंतर 16,000 हून अधिक कोरोना रुग्ण


आकडेवारी पाहिली तर कोविड-19 च्या रुग्णांनी तब्बल 64 दिवसांनंतर 16,000 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे भारतात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 3,48,38,804 पर्यंत पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 91,361 वर पोहोचली आहे. 


भारतात एका दिवसात संसर्गाची 16,794 नवीन प्रकरणं आढळली, तर 220 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता एकूण 4,81,080 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याआधी 27 ऑक्टोबर रोजी 24 तासांत कोरोना विषाणूचे 16,158 नवीन रुग्ण आढळले होते.


आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोना रुग्णांची संख्या 91,361 वर पोहोचली आहे. संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी हे 0.26 टक्के आहे. तर कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.36 टक्के नोंदवला गेला आहे.