मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. दररोज काही राज्यांमध्ये राज्यांमध्ये वेगाने प्रकरणं समोर येतायत. ओमायक्रॉनमुळे, केसेस देखील वेगाने वाढतायत. पण आता ही तिसरी लाट किती घातक ठरणार आहे, तसंच येत्या काळात आणखी मृत्यू होणार आहेत का? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं एनटीजीआयचे (India's National Technical Advisory Group on Immunisation) अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी दिलीयेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ओमायक्रॉन हा डॉमिनंट व्हेरिएंट बनला आहे.


डॉ. अरोरा यांनी सांगितलं की, "आता तिसरी लाट आली आहे. हे खूप धोकादायक आहे आणि हा व्हायरस पूर्वीप्रमाणेच काम करतोय. जगातील सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये ओमायक्रॉन पसरत असून त्याचा प्रभाव भारतातही होताना दिसतोय. भारतात, एका आठवड्यात प्रकरणांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. आपण किती कोरोनाचे प्रोटोकॉल पाळतो यावर पसरण्याचा वेग अवलंबून असणार आहे."


ते पुढे म्हणाले की, येत्या काळात आणखी प्रकरणं वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉन ही लाट आणखी पुढे नेणार आहे. यामध्ये सुमारे 70-80% प्रकरणं ओमायक्रॉनबाधित रूग्णांची आहेत.


डेल्टा अजूनही ईशान्य प्रदेश आणि बंगालमध्ये एक्टिव्ह आहे. दरम्यान ओमायक्रॉनमुळे गंभीर समस्या दिसून आल्या नाहीत. मात्र तरीही ज्येष्ठ व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय.


डॉ. अरोरा पुढे म्हणाले, ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही. या व्हेरिएंटच्या संक्रमणानंतर फार कमी लोकांना रूग्णालयात दाखल करावं लागतंय. आमची युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. ऑक्सिजनपासून ते आयसीयू बेडपर्यंत आम्ही सर्व प्रकारे तयार आहे. 


डॉक्टरांनी लसीबाबतही विश्वास व्यक्त केलाय. त्यांचं म्हणणं आहे की, येत्या दोन ते तीन महिन्यांत आणखी चार - पाच लस भारतात तयार होतील.