मुंबई : कोरोना विषाणूचे ओमायक्रॉन व्हेरिएंट कोविड-19 च्या मूळ स्वरूपाच्या तुलनेत 70 पट वेगाने संक्रमित होते, परंतु त्यामुळे होणाऱ्या रोगाची तीव्रता खूपच कमी आहे, असं एका अभ्यासात म्हटलं आहे. ओमायक्रॉन फॉर्म मानवी श्वसन प्रणालीला कसं संक्रमित करतो याबद्दल प्रथम माहिती या अभ्यासात दिली आहे. हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांना असं आढळून आलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा आणि मूळ SARS-CoV-2 पेक्षा 70 पट वेगाने संक्रमित होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभ्यासात असंही दिसून आलं आहे की, ओमायक्रॉनचे फुफ्फुसांचे संक्रमण मूळ SARS-CoV-2 पेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे, ज्यामध्ये रोगाची तीव्रता कमी दिसून येते.


ओमिक्रॉनचा प्रसार कसा होतो आणि SARS-CoV-2 च्या इतर प्रकारांपेक्षा रोगाची तीव्रता कशी वेगळी आहे हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी 'एक्स-व्हिवो कल्चर'चा वापर केला. ही पद्धत फुफ्फुसांवर उपचार करण्यासाठी फुफ्फुसातील ऊतकांचा वापर करते.


अभ्यासानुसार, ओमायक्रॉन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो परंतु फुफ्फुसाच्या ऊतींना त्याच्या पूर्वीच्या व्हेरिएंटइतकं नुकसान तकरत नाही." 


अभ्यासाचे प्रमुख लेखक चॅन म्हणाले, ओमायक्रॉन व्हेरिएंट लस आणि पूर्वीच्या संसर्गापासून मिळालेली प्रतिकारशक्ती यालाही मात करू शकतो. त्यामुळे ते धोकादायक असण्याचीही शक्यता आहे.


तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, संसर्गाच्या 24 तासांनंतर, ओमायक्रॉन फॉर्म डेल्टा आणि मूळ SARS-CoV-2 पेक्षा सुमारे 70 पटीने अधिक प्रतिकृती बनवल्या आहेत. मात्र मूळ SARS-CoV-2 विषाणूच्या तुलनेत मानवी फुफ्फुसाच्या पेशींमध्ये Omicron 10 पट पेक्षा कमी प्रतिकृती तयार करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे सूचित करते की हा व्हेरिएंट कमी गंभीर आहे.