नवी दिल्ली: सायप्रस युनिवर्सिटीमधील वैज्ञानिकांनी एक दावा केला आहे. त्यांच्या दाव्यावरून सध्या खूप जास्त चर्चा आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचं मिश्रण होऊन एक नवा व्हेरिएंट डेल्टाक्रॉन तयार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड तज्ज्ञांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोव्हिड विशेषतज्ज्ञ डॉ. कृतिका कुप्पल्ली यांनी डेल्टाक्रॉन खरा नाही असं म्हटलं आहे. एका एजन्सीच्या अहवालातून एक माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या नमून्यामध्ये ओमायक्रॉनचा काही अंश सापडल्याचं सांगितलं जात आहे. हा नवा व्हेरिएंट नसून प्रयोगशाळेतील नमुन्यामध्ये झालेलं हे मिश्रण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 


सायप्रस युनिवर्सिटीतील जीवशास्त्राचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिक्स यांनी, ओमायक्रॉन सारखी अनुवांशिक लक्षणं आणि डेल्टा सारखी जीनोम आढळून आल्यामुळे याला 'डेल्टाक्रॉन' असं नाव दिलंय. अहवालानुसार, सायप्रसमध्ये आतापर्यंत डेल्टाक्रॉनचे 25 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान हा प्रकार किती घातक आहे आणि त्याचा परिणाम काय होईल यावर आतात सांगणं घाईचं ठरेलं.



डेल्टाक्रॉनवरून आता तज्ज्ञांमध्ये मतमतांतर पाहायला मिळत आहेत. याआधी देखील लंडनमध्ये विषाणूतज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं जे कुप्पल्ली यांचं मत होतं. 


केंट युनिवर्सिटीमधील वैज्ञानिक मार्टिन मायकेलिस यांच्या म्हणण्यानुसार नमुने थेट पेशंटकडून घेतलेले आहेत की त्यामध्ये काही त्रुटी किंवा मिश्रित झाले आहेत का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 


हा नवा व्हेरिएंट कसा आहे किती वेगानं पसरतो? तो किती धोकादायक आहे याबाबत आता काही थेट निकष काढणं कठीण आहे. त्यामुळे सध्या यावर अनेक मतमतांतर पाहायला मिळत आहेत.