मुंबई : कोरोना व्हायरसची प्रकरणं नक्कीच कमी झालेली आढळून येतायत. मात्र असं असूनही कोरोनाचा धोका अजून कमी झालेला नाही. कारण कोरोना व्हायरस सतत त्याचं रूप बदलताना दिसतोय. आतापर्यंत कोरोनाचे अनेक व्हेरिएंट समोर आले आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट समोर आल्यानंतर, हा कमी धोकादायक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही याचे सव व्हेरिएंट दिसून आले, ज्यामुळे चिंता अधिकच वाढली.


BA.2 वेगाने पसरतोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अका अभ्यासानुसार, कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट BA.2 केवळ वेगाने पसरत नाही तर गंभीर समस्यांचं कारणंही बनतो. संशोधनात असं समोर आलंय की, BA.2 व्हेरिएंट पसरण्यासोबतच संसर्ग झालेल्या व्यक्तींनाही संक्रमित करतो. 


WHO नव्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवून


आम्ही ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. WHO त्या देशांवरही लक्ष ठेवून आहे ज्या देशांमध्ये तिसऱ्या लाटेदरम्यान ओमायक्रॉनच्या केसेसमध्ये वाढ झाली होती. या सब व्हेरिएंटमुळे पुन्हा धोका निर्माण होणार नाही ना यासाठी WHO दक्षता बाळगतंय.


ब्रिटनमधून समोर आली डेल्टाक्रॉनची प्रकरणं


यूकेच्या हेल्थ सिक्युरिटी एजेंसीने दिलेल्या माहितीप्रमाणे, अजून तज्ज्ञांना डेल्टाक्रॉन व्हेरिएंटबाबत जास्त माहिती नाहीये. हा व्हेरिएंट किती संसर्गजन्य आणि गंभीर आहे याची माहिती घेणं बाकी आहे. त्याचप्रमाणे, याची लक्षणं आणि वॅक्सिन याविरोधात किती प्रभावी आहे याचीही माहिती अजून तज्ज्ञांना नाही.