Health News : आजच्या घडीला रस्त्यावरून चालत असताना, रेल्वेनं प्रवास करताना, इतकंच काय तर सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलं असतानाही अनेक मंडळी त्यांच्याच धुंदीत दिसतात. कानाला असणाऱ्या (headphones) हेडफोन्समध्ये मोठ्या आवाजात ही मंडळी गाणी ऐकत किंवा इतर काही गोष्टी, व्याख्यानं ऐकत प्रवास करत असतात. पण, ते स्वत:मध्ये रमलेले असतानाच त्यांचं आरोग्य मात्र धोक्याच्या वळणावर जाताना दिसतं. हे कुणी उथळपणे म्हटलेलं नाही, तर हे सर्वकाही WHO नं आकडेवारीनिशी जाहीर केलं आहे. (use of headphones may harmed you)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नं दिलेल्या गंभीर इशाऱ्यानुसार आतापर्यंत केलेल्या पाहणीत जगभरात 10 लाख लोकांना बहिरेपणाचा धोका असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. बीएमजे ग्लोबत हेल्थ पत्रकामध्ये जाहीर करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार हेडफोन्स लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यानं व्यक्तीच्या श्रवणेंद्रियाला इजा पोहोचून त्यांच्यामध्ये कर्णबधिरपणा बळावण्याचा धोका संभवतो. 


जगभरातील 10 लाख व्यक्तींवर बहिरेपणाचं संकट 


जगात जवळपास 10 लाख व्यक्ती, प्रामुख्यानं  युवांमध्ये हेडफोन्स लावून गाणी ऐकणाऱ्यांमग्ये काळानुरुप बहिरेपणा वाढू शकतो. अनेकांनाच हेडफोन्स लावून काहीही ऐकण्याची सवय असते. पण, मनोरंजनासाठी असणारी हीच सवय त्यांना पुढे जावून अडचणीत आणू शकते. 


वाचा : Hair Dandruff : हिवाळ्यात कोंड्याची समस्या भेडसावतेय, 'हे' उपाय करून बघा



हेडफोन्समुळं नेमकं काय होतं? (what happen with Excesive use of headphones?)


हेडफोन्स लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळं व्यक्तीची ऐकण्याची क्षमताच संपून जाते आणि बहिरेपणाचा धोका बळावतो. निरिक्षणानुसार 43 कोटींहून अधिक व्यक्ती, म्हणजेच जगातील लोकसंख्येच्या पाच टक्के लोक सध्याच्या घडीला व्यवस्थित ऐकू शकत नाहीत. 2050 पर्यंत हा आकडा वाढून 700 मिलियन म्हणजेच 70 कोटींपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हालाही हेडफोन्सवर सतत काही ना काही ऐकण्याची सवय असेल, तर आताच स्वत:ला आवर घाला. कारण, हीच सवय तुमचा घात करु शकते.