मुंबई  :  केसगळती ही काही प्रमाणात प्रत्येकामध्ये आढळून येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसगळतीचे प्रमाण दिवसाला 100 पेक्षा अधिक असल्यास ती समस्या गंभीर आहे. या समस्येचे एक कारण म्हणजे  टाळूला होणारा अपुरा रक्तप्रवाह ! मग त्यावरचा एक उपाय म्हणजे टाळूला मसाज करा.


एक्सपर्ट सल्ला 


डॉ. एच. के. भाकरू  यांच्या मते, केस धुतल्यानंतर बोटांनी टाळूला मसाज करणे हा केसगळती रोखण्याचा एक सहज- सोपा घरगुती उपाय आहे.


कसे आहे फायदेशीर ? 


डॉ. एच. के. भाकरू, यांच्या ‘होम रेमेडीज फॉर कॉमन इएलमेंट्स’ या पुस्तकात लिहल्यानुसार थंड पाण्याने केस धुतल्यानंतर टाळूवर हातांच्या बोटांनी मसाज करावा. यामुळे डोक्याजवळील रक्तवाहिन्यांना चालना मिळाल्याने रक्तप्रवाह सुधारतो.परिणामी केसांची वाढदेखील सुधारते. हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी केसगळती कशी रोखाल ? 


तुम्ही काय कराल ? 


तुम्हांला सोसवेल अशा तापमानाने केस धुवावेत. मात्र केस धुताना फार गरम पाण्याचा वापर करू नका. शेवटी ते कोमट किंवा साध्या पाण्याने धुवून निथळत ठेवा. यामुळे केस गुंतण्याची शक्यता कमी होते. 


काही वेळाने केस टॉवेलने पुसा आणि कोरडे करा. त्यानंतर हाताच्या बोटांनी गोलाकार दिशेने मसाज करा.


खबरदारीचा उपाय – 


मसाज करताना तो हळूवार आणि समान प्रमाणात असावा. खूप जोरजोरात केसांना मसाज करणे, मसाज करताना नखांचा केसांना, टाळूला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. टाळूला इजा / जखम होण्याची शक्यता असते.