ब्रिटिशमध्ये एका वर्षाची चिमुकली हृदयविकाराचा झटका आल्याने आयुष्याशी लढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीला कार्डिअक अरेस्ट येऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. ज्याला मायोकार्डिटिस असे संबोधले जाते. शरीरातील कमी प्रतिक्रारशक्तीमुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मायोकार्डिटिस व्हायरल इन्फेक्शन आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर सारख्या परिस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रीटिक्सच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिला इतर चार भावंडांसह जूनमध्ये पोटात दुखण्याची समस्या जाणवली. पण यानंतर इतर भावंडांना बरं वाटलं पण ब्रीटिक्सला उलट्या, ताप आणि भूख कमी लागणे यासारख्या समस्या जाणवू लागल्या. यानंतर तिने अन्न सोडलं, सतत रडणे आणि सतत कान ओढण्यासारख्या कृती करु लागल्या. 


बरेच दिवस असे गेले पण ब्रीटिक्सच्या तब्बेतीमध्ये काहीच सुधारणा नव्हती. यानंतर एक वर्षाच्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि हाता-पायावर सूज येऊ लागली. एवढंच नव्हे तर लघवीची समस्या देखील जाणवू लागली. तेव्हा मुलीसोबत काही तरी वेगळं होत असल्याची दाट भावना तिच्या आईच्या मनात घर करू लागली. 


यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपशीलवाल तपासण्या केल्यानंतर एक वर्षाची चिमुकली मायोकार्डिटिसच्या आजाराने त्रस्त असल्याचे कळले. यामध्ये तुमच्या हृदयाची रक्त पंप करण्याची समस्या कमी होते. हे ऐकताच मुलीच्या पालकांच्या डोळ्यात पाणी आलं. 


हृदयाला सूज येणे 


हृदयविकाराची ही समस्या लक्षात आल्यानंतर बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्याच दिवशी रुग्णालयात आणताच बाळाला सहा मिनिटांत हृदयविकाराचा झटका आला. तीन तास उपचार केल्यानंतर ती स्टेबल झाली. यानंतर बाळाच्या काही जेनेटिक चाचण्या करण्यात आला. तसेच अनेक औषधं तिला सुरु करण्यात आले. 


मायोकार्डिटिस शरीरात दिसतात ही लक्षणे? 


चेहऱ्याचा रंग बदलणे
हृदय किंवा हृदयाच्या स्नायूंमध्ये सूज असल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग गडद किंवा गडद होऊ शकतो. जर तुमचा चेहरा बराच काळ लाल राहिला तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नये.


चेहऱ्यावर सूज येणे
चेहऱ्यावरील सूज वाढणे हे देखील हृदयाच्या स्नायूंमध्ये जळजळ होण्याचे लक्षण असू शकते. या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.


डोळे लाल होणे
डोळ्यांची लालसरपणा दीर्घकाळ टिकून राहणे सामान्य नाही. हे हृदयात जळजळ होण्याचे लक्षण देखील असू शकते. जर तुमचे डोळे जास्त काळ लाल होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


चेहऱ्यावर जास्त घाम येणे
चेहऱ्यावर जास्त घाम येणे हे देखील हृदयाच्या जळजळीचे लक्षण असू शकते. या परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला आणि तपासणी करणे आवश्यक आहे.