कांद्याबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
कांद्याला किचनमध्ये मोठे महत्त्व आहे. कांद्याशिवाय भाजीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
मुंबई : कांद्याला किचनमध्ये मोठे महत्त्व आहे. कांद्याशिवाय भाजीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. दरम्यान, काहींना कांदा वर्ज्य असल्याने ते कांद्याशिवाय भाजी बनवतात. मात्र कांद्यामुळे भाजीचा स्वाद अधिक वाढतो. कांद्याबाबतची कठीण गोष्ट म्हणजे कांदा कापणे. कांदा कापताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु होतात. मात्र अशा काही टिप्स आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही कांदा सोप्या पद्धतीने कापू शकतात.
१. कांदा कापण्याआधी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर कांदा कापल्यास डोळ्यातून पाणी येणार नाहीत.
२. जर तुम्ही कांद्याशिवाय ग्रेव्ही बनवताय तर कोबी बारीक कापून तो कांद्याप्रमाणे बारीक वाटून अथवा फ्राय करुन घ्या. याचा ग्रेव्हीमध्ये वापर करा.
३. सलाडसाठी भाज्या कापताना नेहमी भाज्या तिरकस कापा यामुळे भाज्यांमधील ज्यूस कायम राहतो.
४. सलाड बनवण्याआधी टोमॅटो धुवून दहा मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे टोमॅटो तुम्ही हव्या त्या आकारात कापू शकता.
५. उकडलेल्या बटाट्यांचे सलाड बनवताना त्यात मीठ, चिमूटभर साखर, दोन तीन पुदिन्याची पाने आणि अर्धा चमचा तेल मिसळा. यामुळे बटाटे अधिक स्वादिष्ट होतील.
६. गाजर, मुळ्याची कोशिंबीर बनवताना या भाज्या कापून दीर्घकाळ ठेवू नका. यामुळे त्यामुळे पौष्टिक गुण कमी होतील.
७. फ्लॉवर भिजवताना त्यात एक चमचा दूध टाका. यामुळे फ्लॉवरचा रंग जाणार नाही.
८. डाळ शिजवताना त्यात थोडी हळद आणि तेलाचे थेंब टाका. यामुळे डाळ लवकर शिजेल.
९. दहीवडे बनवताना डाळ वाटताना त्यात उकडलेला बटाटा टाता. यामुळे वडे मऊ होतील.
१०. ग्रेव्ही बनवताना टोमॅटो नसल्यास तुम्ही सफरचंदाचा वापर करु शकता.