मुंबई : नोकरी आणि घर सांभाळता अनेकजणींची तारेवरची कसरत चालू असते. या धावपळीत व्यायामासाठी वेळ नसतो आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात. त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मग त्वचेवरील फ्रेशनेस परत आणण्यासाठी या वीकएन्डला हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा.


अंड्याचा सफेद भाग आणि कच्च दूध:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेचे पोर्स स्वच्छ करण्यासाठी आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा फेसपॅक अत्यंत उपयुक्त आहे. अंड्याच्या सफेद भागात चमचाभर कच्च दूध घालून मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यावर पील करा.


बेसन आणि पाणी:


आई किंवा आजीकडून या फेसपॅक बद्दल तुम्हाला कळलं असेल. हा फेसपॅक जुना असला तरी अतिशय परिणामकारक आहे. चण्याच्या पिठामुळे त्वचा मॉईश्चराइज होते.


काकडी आणि लिंबू:


काकडी कापून कुस्करा त्यात लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. त्वचा हायड्रेट होते आणि रिफ्रेशिंग वाटते.


मध आणि लिंबू:


हे दोन्ही पदार्थ नैसर्गिक ब्लिचिंग अजन्ट्स आहेत. त्यामुळे त्वचा नितळ आणि सतेज होते. तसंच मधामुळे त्वचा मॉईश्चराइज होते.


मध आणि बटाट्याचा रस:


टॅनिंग दूर करण्यासाठी आणि त्वचेचा टोन दूर सुधारण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो. मधामुळे त्वचा स्वच्छ होऊन मॉईश्चराइज होते.